...म्हणून मुंबईतील डबेवाले जाणार 4 दिवसांच्या सुट्टीवर

26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरदरम्यान मुंबईत चार दिवस डब्याची सुविधा उपलब्ध होणार नसल्यानं कर्मचाऱ्यांचे हाल होणार आहेत

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2019 03:00 PM IST

...म्हणून मुंबईतील डबेवाले जाणार 4 दिवसांच्या सुट्टीवर

मुंबई, 26 ऑक्टोबर: प्रत्येक संकटावर मात करून मुंबईतील प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत डबा पोहोचवणारे डबेवाले मात्र चार दिवस सुट्टीवर असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होणार आहेत. दिवाळी सण साजरा करण्यासाठी डबेवाल्यांनी 4 दिवसांची सुट्टी घेतली आहे. 26 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरदरम्यान मुंबईत चार दिवस डब्याची सुविधा उपलब्ध होणार नसल्यानं कर्मचाऱ्यांचे हाल होणार आहेत. मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. या चार दिवसांचे डब्याचे पैसे कापू नयेत अशी विनंतीही सुभाष तळेकर यांनी ग्राहकांना केली आहे.

जुलै महिन्यात मुंबईतील डबेवाले दोन दिवस सुट्टीवर गेले होते. मात्र गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी आधीच जाहीर केलं होतं. त्या दोन दिवसांमध्ये मुंबईतील अनेक कर्मचाऱ्यांचे हाल झाले होते. याशिवाय आषाढी एकादशीच्या दिवशीही डबेवाल्यांनी सुट्टी घेतली होती. मात्र सुट्टी घेण्याआधीच आषाढी एकादशीला डब्याची सुविधा बंद असेल असं कळवण्यात आलं होतं.

आपल्यासाठी सगळ्या संकटांवर मात करून वेळेत डबा पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांनाही दिवाळी त्यांच्या कुटुंबासोबत साजरी करता यावी यासाठी 4 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे यादिवसांमध्ये डबे पोहोचवण्याची सुविधा बंद असेल. त्याचबरोबर ग्राहकांनी डबेवाल्यांचे 4 दिवसाचे पैसे कापू नयेत अशीही विनंती यावेळी डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.

क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात मोठं नुकसान, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbai
First Published: Oct 26, 2019 03:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...