चोरी करण्यासाठी फ्लॅटमध्ये घुसला, दारूची बाटली बघून मन बदललं आणि...

चोरी करण्यासाठी फ्लॅटमध्ये घुसला, दारूची बाटली बघून मन बदललं आणि...

दारूपुढे सगळं फेल! चोरी करण्यासाठी घरात घुसला पण बाटली बघून गेला बाराच्या भावात

  • Share this:

मुंबई, 16 फेब्रुवारी : मुंबईत दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र कधी कधी चोरीच्या अशा काही घटना समोर आल्या आहेत की हे ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत. अशीच एक घटना उघडकीस आली, जेथे एक चोर चोरी करायला गेला आणि दारुची बाटली बघून, त्याचे मन विचलित झाले. त्यानंतर जे घडले ते पाहून कोणालाच विश्वास बसणार नाही.

ही घटना मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील गिरिकुंज इमारतीत घडली. या इमारतीत चोर चोरीच्या उद्देशाने एका व्यावसायिकाच्या फ्लॅटमध्ये शिरला. दरम्यान, यावेळी त्याची नजर तिथे ठेवलेल्या शॅम्पेनच्या बाटल्यांवर पडली आणि त्याचा मोह आवरला नाही. या मद्यधुंद चोरट्याने चोरी सोडून महागडी दारू पिण्यास सुरुवात केली. एवढी दारू प्यायलानंतर चोरी करायला आलेला हा चोरटा घरातच बेशुद्ध झाला. त्यानंतर सकाळी घरकाम करण्यासाठी आलेल्या नोकराने चोरट्याला घरात झोपलेले पाहिले आणि आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली.

वाचा-खेड शिवापूर टोल नाक्याचं आंदोलन पेटलं, आंदोलकांनी अडवला एक्सप्रेस वे

वाचा-पप्पा तुम्ही दारू का पिता? असं विचारल्यामुळे बापानेच लेकीला जिवंत जाळलं

नोकरानं तातडीने पोलिसांना फोन करत याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा खुलासा केला. चोराने इतका मद्यपान केला की तो तेथेच पडला होता. पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने संपूर्ण घटनेचे रंजक पद्धतीने वर्णन केले.

वाचा-केजरीवालांची 'फुकट'योजना राज्यात नको, पवारांनी काँग्रेसच्या मंत्र्याला फटकारलं

संजीव असे चोरट्याचे नाव सांगितले जात आहे. तो बाल्कनीतून व्यावसायिकाच्या फ्लॅटमध्ये शिरला होता. त्यानंतर चोरी करायची होती घरात शिरलेला चोरटा दारूची बाटली पाहून तिथेच थांबला पण दारू पाहून त्याचे मन स्तब्ध झाले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून चाकूही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

वाचा-वरातीत पत्नीसोबत केला धमाल डान्स, त्याच अंगणातून निघाली नवरदेवाची अंत्ययात्रा

तर, घरात काम करणाऱ्या नोकराने शॅपेनच्या काही बाटल्या फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. सकाळी चोराला पकडले असता काही बाटल्या कचऱ्यात पडलेल्या दिसल्या, तर काही बाटल्या फ्रीजमध्येच ठेवल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनीही निवेदन दिले आहे. पोलिसांनी सांगितले की संजीव बाल्कनीतून नवीन फ्लॅटमध्ये दाखल झाला होता. सध्या पोलीस संजीव वर्माची चौकशी करत आहेत.

First published: February 16, 2020, 11:22 AM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या