ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 9 ऑक्टोबर : ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89व्या वर्षी काकडे यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बुधवारी (9 ऑक्टोबर) दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचं मुंबईतील राहत्या निवासस्थानी निधन झालं. 50 वर्षांहून अधिक वर्ष ते रंगभूमीवर कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. 94व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदही भूषवले आहे.

अरुण काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास सन्मान या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. अरुण काकडे हे समांतर मराठी रंगभूमीवरील रंगायन, आविष्कार या नाट्यसंस्थांचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी 'अमका' हे आत्मचरित्र लिहिलेले.

(वाचा : अमिताभ बच्चन यांचं खरं नाव 'इन्कलाब'? बिग बींनी स्वतः सांगितलं सत्य)

अरुण काकडे यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 04:20 PM IST

ताज्या बातम्या