मुंबई : गुढीपाडव्यालाही रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक

मुंबई : गुढीपाडव्यालाही रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक

  • Share this:

17 मार्च : उद्या गुढीपाडवा मात्र मुंबईकरांना उद्याही मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे उद्या घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांनी लोकलचे वेळापत्रक पाहून बाहेर पडावं.

मध्य रेल्वेवर कल्याणे ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते 4.15 वाजेपर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे.  तर हार्बरवर कुर्ला-मानखुर्द, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील फेऱ्या सकाशी १०.५४ ते दुपारी ४.१९ पर्यंत ठाण्यापर्यंत अप धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत.

तर हार्बरवर कुर्ला-मानखुर्द, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील फेऱ्या स. १०.५४ ते दु. ४.१९पर्यंत ठाण्यापर्यंत अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. ठाणे ते सीएसएमटीपर्यंत लोकल अप जलद मार्गावर चालतील. सीएसएमटीहून सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद लोकल स. १०.१६ ते दु. ३.२२पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंडला थांबतील.

हार्बरसाठी विशेष गाड्या

हार्बरवर कुर्ला ते मानखुर्दमध्ये अप आणि डाउन मार्गावर स. ११.१० ते दु. ४.१०पर्यंत ब्लॉक आहे. सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी मार्गांवरील दोन्ही दिशेकडील वाहतूक स. १०.२१ ते दु. ३.४७पर्यंत खंडित राहील. या कालवधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी-कुर्ला आणि मानखुर्द-पनवेलपर्यंत विशेष गाड्या चालविण्यात येतील.

पश्चिम रेल्वेवरील फेऱ्या रद्द

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रलमध्ये दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५पर्यंत ब्लॉक आहे. या कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक ही अप आणि डाऊन धीम्या मार्गावर चालेल. त्यासह काही फेऱ्या रद्द करण्यात येतील.

 मध्य रेल्वेवर ब्लॉक

- सकाळी ११.१५ ते दु. ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक

- कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर ब्लॉक

हार्बर रेल्वेवर ब्लॉक

- कुर्ला-मानखुर्द अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक

- स. ११.१० ते दु. ४.१०पर्यंत ब्लॉक

- सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर, वाशी मार्गांवरील दोन्ही दिशेकडील वाहतूक स. १०.२१ ते दु. ३.४७पर्यंत खंडित

- सीएसएमटी-कुर्ला आणि मानखुर्द-पनवेलपर्यंत विशेष गाड्या

पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

-  चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक

- दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर स. १०.३५ ते दु. ३.३५पर्यंत ब्लॉक

- पश्चिम रेल्वेवरील काही फेऱ्या रद्द

First published: March 17, 2018, 10:21 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading