मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई : आंदोलनकर्ते शेतकरी आज आझाद मैदानात करणार मुक्काम, उद्या असा आहे कार्यक्रम

मुंबई : आंदोलनकर्ते शेतकरी आज आझाद मैदानात करणार मुक्काम, उद्या असा आहे कार्यक्रम

राज्यपालांना निवेदन देण्यासाठी राजभवनाकडे निघालेले आंदोलनकर्ते मेट्रो थेटर्स येथून परत आझाद मैदान येथे गेले.

राज्यपालांना निवेदन देण्यासाठी राजभवनाकडे निघालेले आंदोलनकर्ते मेट्रो थेटर्स येथून परत आझाद मैदान येथे गेले.

राज्यपालांना निवेदन देण्यासाठी राजभवनाकडे निघालेले आंदोलनकर्ते मेट्रो थेटर्स येथून परत आझाद मैदान येथे गेले.

    मुंबई, 25 जानेवारी : राजधानी मुंबईत मोर्चा काढत राज्यातील शेतकऱ्यांनी (Farmer Protest) दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसंच या मोर्चानंतर शेतकरी आपल्या मागण्यांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देणार होते. मात्र राज्यपाल गोव्यात असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आणि संतापलेल्या शेतकऱ्यांनी निवेदन फाडत याबाबत आपला निषेध नोंदवला आहे. राज्यपालांना निवेदन देण्यासाठी राजभवनाकडे निघालेले आंदोलनकर्ते मेट्रो थेटर्स येथून परत आझाद मैदान येथे गेले. आंदोलनासाठी आलेले हे शेतकरी आज आझाद मैदानात मुक्काम करणार असून उद्या झेंडावंदन करत ते आपआपल्या मूळ गावाकडे निघणार आहेत. दरम्यान, राज्यपालांचा गोव्याच्या विधिमंडळाचा कार्यक्रम 4 महिन्यांपूर्वीच ठरला असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र 22 जानेवारीला आम्ही राजभवनात भेटायला येऊ असं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळेस राज्यपाल आजच्या दिवशी मुंबईत नसतील हे सांगण्यात आलं होतं आणि राज्यपालांचं सचिव मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारतील, असंही सांगितलं गेल्याची माहिती आहे. हेही वाचा - 'राज्यपालांना कंगनाला भेटण्यासाठी वेळ, मात्र शेतकऱ्यांना भेट नाही', शरद पवारांची पुन्हा विखारी टीका दरम्यान, मुंबईत झालेल्या या शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उपस्थित नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यावर उतरला आहे, पण पंतप्रधानांनी त्यांची चौकशी केली का? पंजाब शेतकरी म्हणजे पाकिस्तानचा आहे का?' असा सवाल करत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Farmer, Farmer protest, Mumbai

    पुढील बातम्या