मुंबई- ठाण्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार; दृश्यमानताही झाली कमी

मुंबई- ठाण्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार; दृश्यमानताही झाली कमी

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. पुढच्या 24 तासांसाठी काय आहे weather alert?

  • Share this:

मुंबई, 7 जुलै : मान्सूनने जून अखेरीस जोर धरल्यानंतर मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. सोमवारी थोडा ओसरलेला जोर मंगळवारी दुपारी पुन्हा वाढला आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. पुढचे 24 तास या प्रकारे काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. अधून मधून थांबत जोरदार पाऊस कोसळेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.

मंगळवारी दुपारी 2 वाजेपर्यंतच्या 6 तासांत मुंबई परिसरात विशेष पाऊस झाला नव्हता. 40 मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद नव्हती. पण त्यानंतर पावसाने जोर धरला आहे आणि उपनगरांत अधिक पाऊस आहे. सखल भागात पाणी साठायला सुरुवात झाली आहे. ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई परिसरात दुपारनंतर वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. पुढचे काही तास अशाच जोरदार सरी कोसळत राहतील, असा अंदाज आहे. संततधार पावसाऐवजी अशा जोरदार पण अधून मधून थांबणाऱ्या मुसळधार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण किनारपट्टीवर सगळीकडेच पावसाचा जोर कायम राहणार असून नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

संकलन - अरुंधती

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: July 7, 2020, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading