सावधान! मुंबई, ठाणे आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता

सावधान! मुंबई, ठाणे आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक केल्याने गर्दी वाढत आहे. त्यात आता पाऊस असल्याने सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.

  • Share this:

मुंबई 1 जुलै: मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. काही दिवस कोसळल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे प्रचंड उकाडा झाला होता. हवामानात बदल झाल्याने ही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. जुलैमहिन्यात भरपूर पाऊस पडेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.सी. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक केल्याने गर्दी वाढत आहे. त्यात आता पाऊस असल्याने सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे.

यावर्षी सरासरी एवढा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचं संकट असल्याने प्रशासनाची चिंता आता वाढणार आहे.

पावसाळ्यात दरवर्षी आजाराचं प्रमाण वाढत असतं. डेंग्यू, मलेरियासारखे आजार कायम डोकं वर काढतात. त्याची साथही पसरत असते. त्यामुळे कोरोना आणि या साथींना अटकाव करण्याचं दुहेरी संकट सरकारसमोर असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनीही पावसाळ्यात जास्त काळजी घ्या असं आवाहन जनतेला केलं आहे. त्याचबरोबर प्रशासनाने जय्यत तयारी सुद्धा केली असून साथ आणि व्हायरसला अटोक्यात आण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: July 1, 2020, 11:53 PM IST

ताज्या बातम्या