News18 Lokmat

डोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं !

कोणत्याही पालिकेच्या गटार, फुटपाथ किंवा चेंबरवरील झाकणावर त्या त्या पालिकेची नावे असतात. मात्र डोंबिवलीमध्ये मात्र चक्क गटारावरील फूटपाथवर चक्क ठाणे महापालिका आणि मुबंई महापालिकेचे झाकण लावण्यात आली आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2018 10:00 PM IST

डोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं !

 प्रदीप भणगे, प्रतिनिधी

डोंबिवली, 25 एप्रिल :  कोणत्याही पालिकेच्या गटार, फुटपाथ किंवा चेंबरवरील झाकणावर त्या त्या पालिकेची नावे असतात. मात्र डोंबिवलीमध्ये मात्र चक्क गटारावरील फूटपाथवर चक्क ठाणे महापालिका आणि मुबंई महापालिकेचे झाकण लावण्यात आली आहेत. तर काही झाकणावर नावे खोडलेली आहेत.

डोंबिवली मानपाडा रोडवर एका बाजूच्या गटारानवरील फूटपाथवर चक्क ठाणे महापालिका आणि मुबंई महापालिकेचे झाकण लावण्यात आली आहेत. तर काही झाकणावर नावे खोडलेली आहेत. तर दुसऱ्या बाजूला केडीएमसी नावचीच झाकणे लावण्यात आली आहेत.

नियमानुसार, कोणत्याही पालिकेच्या गटार, फुटपाथ किव्हा चेंबरवरील झाकणावर त्या त्या पालिकेची नावे टाकायची असतात मात्र डोंबिवलीमध्ये चक्क ठाणे महापालिका आणि मुबंई महापालिकेचे झाकण लावण्यात आली असल्याने चांगलीच खळबळ माजली आहेत. हा झाकण घोटाळा असून पालिकेच्या अधिकाऱ्यांना काहीच वाटत नाही. उलट ते समर्थन करत आहेत. आयुक्तांनी संपुर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माजी नगरसेवक सदा थरवळ यांनी केली आहे.

याबाबत पालिकेच्या आयुक्तांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र झाला नाही. मात्र केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सांगितले की, आपल्या हद्दीत केडीएमसी हेच नावं टाकले पाहिजे आणि सदर प्रकरणाची कारवाई केली जाईल असं सांगितलं. आता सदर प्रकाराची चौकशी केली जाणार का हे पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2018 10:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...