VIDEO : अन् मराठा मोर्चात अवतरले 'मुख्यमंत्री'

VIDEO : अन् मराठा मोर्चात अवतरले 'मुख्यमंत्री'

आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मराठा आरक्षणासाठी आज विठोबाला साकडे घालत ठाण्यात मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या वेशात आलेल्या आंदोलकाला घेराव करत विठुरायाचे दर्शन घेऊन दिले नाही अशा प्रकारचे पथनाट्य मराठा आंदोलकांनी सादर केले.

  • Share this:

ठाणे, 23 जुलै : आंदोलनाच्या चौथ्या दिवशी मराठा आरक्षणासाठी आज विठोबाला साकडे घालत ठाण्यात मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या वेशात आलेल्या आंदोलकाला घेराव करत विठुरायाचे दर्शन घेऊन दिले नाही अशा प्रकारचे पथनाट्य मराठा आंदोलकांनी सादर केले. आणि आपली मागणी मान्य करा अशा घोषणा दिल्या. गेली ४ दिवस ठाण्यातील कोर्ट नाका चौकात मराठा आंदोलक ठिया आंदोलन करतायेत काल सरकारचा निषेध करण्यासाठी निषेधाची दिंडी काढली होती. आज विठ्ठलाची, तुकारामांची तसच वारक-यांची वेशभूषा करून मुख्यमंत्री वेशकरून मुख्यमंत्री बनून विठुरायाचे दर्शन घेण्याकरता आलेल्या आंदोलकांला मराठा आंदोलकांनी घेराव घातला आणि घोषणाबाजी केली.

ठाण्याच्या कोर्ट नाका चौकात शासकीय विश्राम गृहाबाहेर हे पथनाट्य प्रसारमाध्यमांसमोर सादर करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आरक्षण मिळेपर्यंत शासकीय विभागातील मेगा भरती स्थगित ठेवावी आदी मागण्यांसाठी सरकारने लेखी आश्‍वासन द्यावे, यासाठी सकल मराठा समाजाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून त्याचा आज चौथा दिवस आहे.

रुग्ण दगावल्याचं खापर पोलिसांच्या माथी, सुरक्षा दलावरच केली दगडफेक

जिल्हा प्रशासनाने आज आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. परंतु सरकारच्या फसव्या घोषणांवर विश्‍वास नाही, जोपर्यंत परळीत येऊन सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत ठाण्यातही ठिय्या आंदोलन सुरू राहिल, अशी भूमिका घेतलीये.

हेही वाचा...

आषाढी एकादशीनिमित्त बिग बींनी केलं पांडुरंगाला अभिवादन

'तेल गेलं तूप गेलं...' कटरने कापलं एटीएम आणि...!

'गाईला वाचवा पण बाई असुरक्षित याची मला लाज वाटते'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 01:24 PM IST

ताज्या बातम्या