मुंबई, 04 सप्टेंबर : राज्यातील काही भागांमध्ये येत्या 48 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. 6 सप्टेंबरला विजांच्या कडकडाटासह अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. मुंबई-ठाण्यासह उपनगरांमध्ये दोन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे. पुढील 48 तासांत कोकणात मध्यम तर विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांत आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागानं नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार मुंबई-ठाण्यासह उपनगरात पुढील 2 ते 3 दिवस ऊन असेल त्यामुळे तापामानात वाढ होण्याची शक्यता आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मात्र मुसळधार पाऊस कोसळेल.
As per IMD GFS guidance, nxt 48 hrs, ghat areas of Mah likely to get hvy RF at isol places;thunderstorms with lightning.6 Sep, there could be increase in TSRA activity in interiors; S Madhya Mah, Marathwada,Vidarbha.
दक्षिण कोकण, कोकण किनारपट्टी आणि गोव्यातील अनेक भागांमध्ये 4 सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड, नांदेड परिसरात 5 आणि 6 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे.