S M L

का सुरू झालंय मुंबईत लोडशेडिंग?

विजेची मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याकरता महापारेषण व महावितरणला विजेचे नियोजन करावे लागणार अाहे. त्यामुळे मुंबई उपनगरं आणि नवी मुंबईमध्ये काही काळ विद्यूत पुरवठा खंडित होणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 1, 2018 03:27 PM IST

का सुरू झालंय मुंबईत लोडशेडिंग?

ठाणे, 01 जून : विजेची मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याकरता महापारेषण व महावितरणला विजेचे नियोजन करावे लागणार अाहे. त्यामुळे मुंबई उपनगरं आणि नवी मुंबईमध्ये काही काळ विद्यूत पुरवठा खंडित होणार आहे. वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत व्हावा यासाठी प्रयत्न सुरू  करू, असं महावितरणानं सांगितलं आहे.

ठाणे मंडळा अंतर्गत नवपाडा, कोपरी, विटावा, कळवा, मुलुंड (पु. व प.) या परिसरास तर वाशी मंडळा अंतर्गत वाशी, ऐरोली, घणसोली, रबाळे, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, तुर्भे MIDC, कोपरखैरणे, बोनकोडे ही ठिकाणं येतात. तेव्हा या परिसरात वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

महापारेषण व महावितरणची टीम रात्रीपासून फिल्डवर कार्यरत असून ही तांत्रिक अडचण लवकरात लवकर दुरुस्त होण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या कालावधीत वरील परिसरातील ग्राहकांनी विजेचा वापर जपून करावा, तसेच तांत्रिक कारणाने उद्भवलेल्या अडचणीच्या प्रसंगी महावितरण व महापारेषणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2018 03:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close