मुंबई, 24 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019चे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार येणार आहे. मात्र, 2014मधील निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत भाजपला फारसं यश मिळालेलं नाही. भाजपला जोरदार फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. या उलट शिवसेनेनं कमी जागा घेऊन चांगली कामगिरी केली आहे. तसंच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनीही महायुतीला काँटे की टक्कर दिली आहे.
हे आहेत मुंबईतील विजयी उमेदवार
1. वरळी आदित्य ठाकरे (शिवसेना)
(वाचा: मुख्यमंत्रिपदावर आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया)
Aditya Thackeray, Shiv Sena, on his victory from Worli assembly constituency: I am very happy that the people have blessed me with so much margin and so many votes. #MaharashtraAssemblyPolls https://t.co/oe6sotQp0x pic.twitter.com/iUVgb4sBry
— ANI (@ANI) October 24, 2019
(वाचा : युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरेंचा दणदणीत विजय, अभिजित बिचुकलेंना मिळाली एवढीच मतं)
2. मलबार हिल मंगल प्रभात लोढा (भाजप)
3. वडाळा कालिदास कोळंबकर (भाजप)
4. मुंबादेवी अमीन पटेल (काँग्रेस)
5. कुलाबा राहुल नार्वेकर (भाजप)
6. धारावी वर्षा गायकवाड (काँग्रेस)
7. सायन कोळीवाडा कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप)
8. माहिम सदा सरवणकर (शिवसेना)
9. शिवडी अजय चौधरी (शिवसेना)
10.भायखळा यामिनी जाधव (शिवसेना)
(वाचा : मुंबईतला MIMचा गड शिवसेनेनं भेदला, यामिनी जाधवांनी केले वारिस पठाणांचा पराभव)
11.बोरिवली सुनिल राणे (भाजप)
बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील राणे विजयी झाले आहेत. बोरिवली मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. भाजपने विनोद तावडे यांचं तिकीट कापून सुनील राणे यांना उमेदवारी जाहीर केली होती.
(वाचा:विनोद तावडेंचं तिकीट कापणाऱ्या सुनील राणेंचा बोरिवलीतून दणदणीत विजय)
12.जोगेश्वरी पूर्व रविंद्र वायकर (शिवसेना)
13. दहिसर मनिषा चौधरी (भाजप)
14.दिंडोशी सुनील प्रभू (शिवसेना)
15. मागाठणे प्रकाश सुर्वे (शिवसेना)
16.कांदिवली पूर्व अतुल भातखळकर (भाजप)
17.चारकोप योगेश सागर (भाजप)
18.मालाड पश्चिम अस्लम शेख (काँग्रेस)
19.गोरेगाव विद्या ठाकूर (भाजप)
20.वर्सोवा भारती लवेकर (भाजप)
21. अंधेरी पश्चिम अमित साटम (भाजप)
22. अंधेरी पूर्व रमेश लटके (शिवसेना)
23. विलेपार्ले पराग अळवणी (भाजप)
24. चांदिवली दिलीप लांडे (शिवसेना)
25. कलिना संजय पोतनीस (शिवसेना)
26. वांद्रे पूर्व झिशान सिद्दीकी (काँग्रेस)
(वाचा : मातोश्रीच्या अंगणात सेनेचा पराभव; महापौरांना बंडखोरीचा फटका)
27.वांद्रे पश्चिम आशिष शेलार (भाजप)
महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांचा 26 हजार 469 मतांनी विजय झाला आहे. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून हा त्यांचा सलग दुसरा विजय आहे. विजयानंतर आशिष शेलार यांनी न्यूज 18 लोकमतसोबत संवाद साधला. आशिष शेलार म्हणाले की, 'ज्याठिकाणी आम्ही हरलो तेथे आत्मपरिक्षणाची गरज आहे. मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण हे भाजपची संसदीय समिती आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चर्चा करून ठरवतील. पण हा युतीचा विजय आहे. मला मिळालेलं मताधिक्य हे खूप आहे. कारण यंदा मतदानाचा टक्का जरी घसरलेला असला तरीही मला 2014एवढंच मताधिक्य मला मिळालं आहे'.
28. मुलुंड मिहीर कोटेचा (भाजप)
29. विक्रोळी सुनील राऊत (शिवसेना)
30. भांडुप पश्चिम रमेश कोरगांवकर (शिवसेना)
31. घाटकोपर पश्चिम राम कदम (भाजप)
32. घाटकोपर पूर्व पराग शाह (भाजप)
(वाचा : Mumbai Election Result 2019 LIVE : भाजपचे सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शहा विजयी)
33. मानखुर्द शिवाजीनगर अबू आझमी (समाजवादी पक्ष)
34. अणुशक्तिनगर तुकाराम काते (शिवसेना)
35. चेंबुर प्रकाश फातर्पेकर (शिवसेना)
36. कुर्ला मंगेश कुडाळकर (शिवसेना)
VIDEO : पैलवान कुणी नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळेंनी सुनावले