मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राज्यात तापमानाचा पारा घसरला, मुंबईकरांना भरली हुडहुडी

राज्यात तापमानाचा पारा घसरला, मुंबईकरांना भरली हुडहुडी

मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे.

मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे.

मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 18 जानेवारी: मुंबईसह राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार सांताक्रूझ परिसरात 11.4 तर कुलाबा परिसरात 14.5 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई पुण्यासह राज्यात इतर ठिकाणी गारठा वाढला आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा आणखी खाली घसरणार असल्याचं हवामान विभागाकडून अंदाज वर्तवला जात आहे. तर महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात थंडीची मोठी लाट आली आहे. नाशिक जिल्ह्यातील 'कॅलिफोर्निया' म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात शुक्रवारी 2.8 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक शहर आणि परिसरात 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नाशिककर देखील या कडाक्याच्या थंडीने चांगलेच गारठले आहे. निफाडचे तापमान सन 2012 मध्ये 0.2 तर 2017 मध्ये 1.7 अंश सेल्सिअसच्या खाली आले होते. निफाडमध्ये शुक्रवारी 2.4 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानची नोंद कुंदेवाडीच्या कृषी संशोधन केंद्रात झाली आहे. निफाड तालुक्यातील उगाव, शिवडी खेडे, वसनगाव, खडकमाळेगाव राणवड आदी गावांमध्ये या कडाक्याचाय थंडीचा परिणाम अधिक जाणवत आहे. तर शहरातील पारा देखील 6 अंशावर गेल्याने नाशिकरांना देखील हुडहुडी भरली आहे.
First published:

Tags: IMD, IMD FORECAST

पुढील बातम्या