गाडीवर टकटक करून गाडीतल्या महागड्या वस्तू चोरणाऱ्या मुंबईच्या 'टकटक गँग'ला अटक

ही गँग रस्त्यातील एखाद्या गाडीच्या काचेवर टकटक करायची. त्यानंतर...

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2018 10:26 AM IST

गाडीवर टकटक करून गाडीतल्या महागड्या वस्तू चोरणाऱ्या मुंबईच्या 'टकटक गँग'ला अटक

13 एप्रिल : मुंबईतील विविध भागात धुमाकुळ घालणाऱ्या टकटक गँगच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय. ही गँग रस्त्यातील एखाद्या गाडीच्या काचेवर टकटक करायची. त्यानंतर कार चालकाला गाडीतून ऑईल लीक होत असल्याचं सांगायची. चालक गाडी चेक करण्यासाठी खाली उतरला की गँगचे इतर सदस्य गाडीतील महागडे मोबाईल, लॅपटॉप आणि इतर महागड्या वस्तू चोरून पळ काढायचे.

काही दिवसांपूर्वी 'टकटक गँग' विरोधात दक्षिण मुंबईतील एका ज्वेलरी डिझायनर महिलेनं पोलिसात तक्रार नोंदविली होती. गेले अनेक महिने मुदलियार फरार होता. मात्र पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर या गँगचा म्होरक्या रविचंद्रन मुदलियारसह त्याच्या सहकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

आरोपी मुदलियारचा एक मुलगा मरिन इंजिनिअर, दुसरा नवी मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयामध्ये सर्जन तर तिसरा मुलगा हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतोय. घरची परिस्थिती चांगली असताना देखील मुदलियार चोरीच्या घटनांना अंजाम देत होता.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 10:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...