रेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या मेगाब्लॉक; 'हे' आहे वेळापत्रक

रेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या मेगाब्लॉक; 'हे' आहे वेळापत्रक

कल्याण ते दिवा स्थानकांमध्ये अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

  • Share this:

10 फेब्रुवारी : मध्य, हार्बर मार्गावर उद्या सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते दिवा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर, तर हार्बरवर नेरूळ ते पनवेलदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक चालणार आहे. कल्याण ते दिवा स्थानकांमध्ये अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

या ब्लॉकदरम्यान अप जलद मार्गावरील वाहतूक अप धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. त्यामुळे अप जलद मार्गावरील लोकल सुमारे १५ मिनिटे उशिराने धावतील.

मध्य रेल्वे : उद्याच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक

- सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५

- कल्याण ते दिवा अप जलद मार्गावर

- १०.१६ ते दु. ३.२२ पर्यंत सुटणाऱ्या लोकल घाटकोपर,

विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकात थांबतीलहार्बर

हार्बर रेल्वे : उद्याच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक

- सकाळी ११.३० ते दुपारी ४.३०

- नेरुळ ते पनवेलदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक

- नेरुळ ते पनवेलदरम्यान वाहतूक सकाळी १०.०३ ते दु. ४.३० वाजेपर्यंत बंद

ट्रान्सहार्बर : उद्याच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक

- सकाळी ११.०२ ते दुपारी ४.२६

- ठाणे ते पनवेल अप मार्गावर

- पनवेल - ठाणे मार्गावर स. 11.14 ते दु. 4 पर्यंत सर्व गाड्या रद्द

- पनवेल - अंधेरी रेल्वे सेवा बंद

- सीएसएमटी ते नेरुळ आणि वाशीदरम्यान विशेष सेवा

पश्चिम रेल्वे : उद्याच्या मेगाब्लॉकचं वेळापत्रक

- सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५

- चर्चगेट ते मुंबई सेंट्रलमध्ये दरम्यान अप आणि डाऊन धीम्या

मार्गावर दुरुस्तीचं काम

- काही रेल्वे गाड्या रद्द

First published: February 10, 2018, 12:39 PM IST

ताज्या बातम्या