09 मे : मुंबईकरांसाठी रेल्वे प्रवास सोईस्कर आणि वेळेवर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन मेहनत घेत आहे. यासाठी 2 आॅक्टोबरपासून नवीन वेळापत्रकात मध्य आणि पश्चिम मार्गावर प्रत्येकी 40 लोकल फेऱ्या वाढवणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. या संबंधी टि्वटर करुन प्रभू यांनी मुंबईकरांना खुश केलं आहे.
Mem Traffic review.40 new services on #Mumbai western¢ral each from 2nd oct with new time table
MRVC works reviewed by MT too.
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) May 8, 2017
रेल्वे बोर्डाचे वाहतूक सदस्य मोहम्मद जमशेद यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी टर्मिनस इथल्या मुख्यालयात उपनगरीय रेल्वेचा आढावा घेतला. यावेळी मुंबई मंडळाचे व्यवस्थापक रविंद्र गोयल यांनी उपनगरीय प्रकल्पांची माहिती जमशेद यांना दिली.
फेऱ्यांपैकी मध्य रेल्वेवर 40 आणि पश्चिम रेल्वेवर 35 फेऱ्या असतील. मध्य रेल्वेच्या एकूण 40 फेऱ्यांमध्ये मेनलाइनवर बारा फेऱ्या आणि हार्बर आणि ठाणे ते वाशी- पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर प्रत्येकी 14 फेऱ्या चालवल्या जातील. नवीन फेऱ्यांचा फायदा ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा इथल्या प्रवाशांना होणार आहे.
पश्चिम रेल्वेवर नवीन 35 फेऱ्यांपैकी दहा फेऱ्या पंधरा डबा लोकलच्या असतील. तसंच, बहुतेक फेऱ्या अंधेरी ते विरार पट्ट्यात चालवल्या जातील, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा