बापरे...मुंबईत दोन लोकल ट्रेन्स समोरासमोर आल्या का? हे आहे तथ्य

बापरे...मुंबईत दोन लोकल ट्रेन्स समोरासमोर आल्या का? हे आहे तथ्य

नेरुळ आणि सीबीडी बेलापूर दरम्यान रेल्वे क्रॉसिंगदरम्यान या गाड्या समोरासमोर आल्या त्यामुळे मोठा अपघात टळल्याची माहिती उघड झाली होती.

  • Share this:

मुंबई 02 जानेवारी : मुंबईतल्या लोकल ट्रेन्स आणि त्यातली गर्दी हा कायम देशभर चर्चेचा विषय असतो. प्रचंड गर्दी आणि त्यात प्रवेश करू इच्छिणारे लाखो प्रवासी यांची दररोज घालमेल होत असते. छोटासाही बिघाड झाला तरी लाखो प्रवाशांचे हाल होतात. आज हार्बर मार्गावरच्या एका घटनेने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. हार्बर मार्गावर दोन ट्रेन्स समोरासमोर आल्यात अशी बातमी आली होती. हा अपघात थोडक्यात टळला असंही सांगितलं गेलं. एक लोकल ट्रेन पनवेलवरून CSMTकडे जात होती तर दुसरी ट्रेन CSMTहून पनवेलकडे जात होती. नेरुळ आणि सीबीडी बेलापूर दरम्यान रेल्वे क्रॉसिंगदरम्यान या गाड्या समोरासमोर आल्या त्यामुळे मोठा अपघात टळल्याची माहिती उघड झाली होती. त्यामुळे ऐन घरी जाण्याच्या वेळी प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. रुळांच्या क्रासिंग यंत्रणेत बिघाड झाल्याने या दोन गाड्या एकमेकांसमोर आल्या होत्या असं बोललं जात होतं.

पण रेल्वे विभागाने दोन लोकल ट्रेन्स एकमेकांसमोर आल्याचं वृत्त फेटाळलंय. पनवेलकड जाणाऱ्या हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड झाला हे खरं आहे. मात्र दोन लोकल ट्रेन्स एकमेकांसमोर आल्या नाहीत असं स्पष्टीकरण रेल्वे विभागाने दिलंय. या ट्रेन्स या पाठोपाठ आल्या होत्या. पण गार्डला जेव्हा काहीचूक असल्याचं आढळलं तेव्हा त्यांनी गाड्या थांबवल्या होत्या हे तथ्य असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2020 07:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading