Home /News /mumbai /

राज्य सरकारकडून मुंबई लोकलच्या नियमात बदल, 18 वर्षांखालील विद्यार्थी ट्रेननं करु शकणार प्रवास

राज्य सरकारकडून मुंबई लोकलच्या नियमात बदल, 18 वर्षांखालील विद्यार्थी ट्रेननं करु शकणार प्रवास

मुंबई लोकल (Mumbai Local) संदर्भात नवी अपडेट समोर आली आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर: मुंबई लोकल (Mumbai Local) संदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारकडून कोरोनाशी (Coronavirus) संबंधित मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासात आणि विशेष सुविधांशी संबंधित नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आता 18 वर्षांखालील शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा मुंबई लोकल ट्रेननं (Local Trains) प्रवास करु शकणार आहेत. याआधी ज्यांचं लसीकरण झालं आहे, त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी होती. सध्या देशात फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोविड -19 (Covid-19) विरुद्ध लस दिली जात आहे. मुंबईत लवकरच शाळा आणि महाविद्यालये उघडणार असल्यानं सरकारनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. यामध्ये विशेषतः ज्युनिअर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जेणेकरून ते वैयक्तिकरित्या शाळा- महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहू शकतील. हेही वाचा- IPL 2021: पंत, अय्यर नाही 'या' खेळाडूला दिल्लीचा कॅप्टन करण्याची गंभीरची सूचना  टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार, ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्याव्यतिरिक्त, जे लोक विशिष्ट आरोग्य संबंधित समस्येने ग्रस्त आहेत, ज्यामुळे ते लस घेऊ शकत नाहीत, डॉक्टरांचं सर्टिफिकेट दाखवून ते लोकं सुद्धा सुविधांचा लाभ घेऊ शकतील. रिपोर्टमध्ये ज्यांना लस मिळाली नाही ते लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकतील, मॉल, मंदिरे (काही जिल्ह्यांमध्ये), रेस्टॉरंट्स, सभागृह, विवाहस्थळे आणि मल्टीप्लेक्समध्ये प्रवेश करू शकतील. यापूर्वी, पश्चिम रेल्वेनं जाहीर केलं होतं की, 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) आणि 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेसाठी हॉल तिकिट दाखवल्यास उपनगरीय रेल्वे तिकिटे दिली जातील. हेही वाचा- KKR vs CSK Dream 11 Team Prediction: 'या' 11 खेळाडूंवर आजमवा तुमचं भविष्य   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं की, ज्यांचं पूर्णपणे लसीकरण झालं आहे ते 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करू शकतील. त्या काळात मुख्यमंत्र्यांनी दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवसांच्या अंतराची अटही ठेवली होती. त्या काळात फक्त विशेष पासधारकांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. गुरुवारी, राज्यात कोविड -19 चे 2384 नवीन रुग्ण आढळले, तर राज्यात 35 लोकांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकारी म्हणाले की, नवीन प्रकरणे आल्यानंतर राज्यात संक्रमित लोकांची संख्या 65,86,280 झाली आहे. कोरोनामुळे आणखी 35 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 1 लाख 39 हजार 705 वर पोहोचली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai local

    पुढील बातम्या