मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; धावपट्टीवरून विमान...Mumbai Rains | Mumbai Airport | Mumbai Rains Live Updates

मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; धावपट्टीवरून विमान...Mumbai Rains | Mumbai Airport | Mumbai Rains Live Updates

मुंबई विमानतळावर सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना टळली.

  • Share this:

मुंबई, 02 जुलै: मुंबई विमानतळावर सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना टळली. जयपूरहून मुंबईला आलेल्या स्पाईस जेटचे विमान धावपट्टीवर उतरत असताना घसरले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विमानतळाचा मुख्य रनवे बंद करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 54 विमान दुसरीकडे वळवण्यात आले आहेत. तर 52 विमान रद्द करण्यात आले आहेत.

गेल्या दोन दिवसात विमानतळावर झालेली ही दुसरी दुर्घटना आहे. याआधी रविवारी रात्री सुरत विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली होती. भोपाळवून सुरतला येणारे विमान धावपट्टीवरून घसरून सेफ्टी एरिया मध्ये गेले होते. विमानाला मोठा अपघात झाला असता पण ते चिखळात अडकल्यामुळे मोठी दुर्घटना टाळली. वैमानिकाने विमानावरील नियंत्रण सोडले नाही त्यामुळे 47 प्रवासी आणि क्रू मेंबर सुरक्षित राहिले.

मुंबई विमानतळावरील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे रविवारी रात्रीपासूनच व्हिजिब्लिटी कमी झाली आहे. असे असताना देखील विमानाला धावपट्टीवर उतरण्याची परवानगी देण्यात आली होती. मुंबई विमानतळाची धावपट्टी 2 हजार 290 मीटर इतकी आहे.

VIDEO: पुण्यात सिंहगड कॅम्प्समधील भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू

First published: July 2, 2019, 10:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading