कल्याण-डोंबिवली रेल्वे मार्गावर 5 तासांचा विशेष मेगाब्लॉक

कल्याण-डोंबिवली रेल्वे मार्गावर 5 तासांचा विशेष मेगाब्लॉक

यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक 5 तास पूर्णपणे बंद राहणार असून एकूण 16 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

  • Share this:

प्रदीप भणगे, मुंबई 25 डिसेंबर : नाताळसाठी सध्या सुट्ट्यांचा मोसम असल्याने लोकल ट्रेन्सवर गर्दी आहे. याच दिवसांमध्ये मुंबईकर फिरायला बाहेर पडतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवसांमध्ये सुद्धा लोकल ट्रेन्सवर जास्तच गर्दी असते. त्यामुळे प्रवासाला जाताना काळजी घ्या. कारण रेल्वेने नेमकं 25 डिसेंबरलाच मेगाब्लॉक जाहीर केलाय. त्यामुळे प्रवासाठी बाहेर निघताना त्याची माहिती असणं गरजेचं आहे.  ठाकुर्ली स्थानकात पादचारी पूलाचे गर्डर उभारण्यासाठी कल्याण-डोंबिवली दरम्यान धीम्या-जलद मार्गांसह पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर बुधवारी 25 डिसेंबर रोजी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 9.45 ते दु. 1.45 या काळात 400 मेट्रिक टन वजनी 6 मीटर रुंदीचे 4 गर्डर उभारण्याचे काम करण्यात येत आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली दरम्यानची वाहतूक 5 तास पूर्णपणे बंद राहणार असून एकूण 16 मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

कल्याण-डोंबिवली रेल्वे मार्गावर पादचारी पुलाच्या कामांसाठी आज 5 तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्यानं प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून विशेष गाड्यांची सुविधा पुरवण्यात येणार आहे. कल्याण स्टेशन आणि  डोंबिवली बाजी प्रभू चौकातून प्रत्येकी 10 मिनटाने बस सोडण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. साधारण 20 ज्यादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती केडीएमटी व्यवस्थापक मारुती खोडके यांनी दिली आहे. दुसरीकडे याचा परिणाम लांब पल्ल्यांच्या गाड्यांवरही होणार असल्यानं लांब पल्ल्यांच्या काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर पादचारी पूलाच्या कामासाठी  रेल्वे प्रशासना तर्फे आज 5 तासाचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे  मनमाड-मुंबई व मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई व मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे व   पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे व पुणे-सीएसएमटी, डेक्कन क्वीन एक्प्रेस,  दादर-जालना आणि जालना-दादर जनशताब्दी, सीएसएमटी-कोल्हापूर,कोल्हापूर-सीएसएमटीसह सीएसएमटी पॅसेंजर यासह इतर 16 गाड्यां रद्द करण्यात आल्या असून त्यात काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे समावेश आहे.ऐन नाताळाच्या दिवशी मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 25, 2019, 7:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading