राहुल गांधींना हरवण्याचा नवस फेडला?14 किलोमीटर चालून स्मृती इराणींनी सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन

लोकसभा निवडणूक 2019मध्ये विजयी झाल्यानंतर भाजपच्या स्मृती इराणी यांनी पायी जाऊन मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.

News18 Lokmat | Updated On: May 28, 2019 07:24 PM IST

राहुल गांधींना हरवण्याचा नवस फेडला?14 किलोमीटर चालून स्मृती इराणींनी सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन

लोकसभा निवडणूक 2019मध्ये गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ अमेठीमध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा दणदणीत पराभव केला. आपल्या या शानदार विजयानंतर स्मृती इराणी यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचे पायी जाऊन दर्शन घेतलं.

आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत स्मृती यांनी सोमवारी रात्री उशिरा सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.

विशेष म्हणजे  तब्बल 14 किलोमीटर उघड्या पायांनी चालत जाऊन त्यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं.

स्मृती इराणी यांची जवळची मैत्रीण आणि टीव्ही प्रोड्यूसर एकता कपूरनं इन्स्टाग्रामवर काही पोटो आणि व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे.

एकता कपूरनं बाप्पाचं दर्शन घेण्यापूर्वी आणि बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतरचेही काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Loading...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्मृती इराणी यांनी कोणताही प्रोटोकोल न पाळता तसंच सुरक्षा कवचाविनाच सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास त्या मंदिरात दाखल झाल्या होत्या.  यावेळेस त्यांच्यासोबत एकता कपूरदेखील होती.

दोघींनीही मंदिरात पूजा अर्चना केल्यानंतर बाप्पाच्या सकाळच्या आरतीमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या.  दरम्यान, नेमका कोणता नवस पूर्ण झाल्यामुळे इराणींनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं? याबाबतची माहिती अस्पष्ट असली, तरीही लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा दारूण पराभव केल्याचा नवस त्यांनी पूर्ण केल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 07:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...