मुंबई, 24 डिसेंबर: MD आणि MBBS शिक्षणाकरता सरकारी कोट्यातून अॅडमिशन मिळवून देण्याचा बनाव रचणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. मुंबईतील सायन हॉस्पिटलचे उपअधिष्ठित्याला (deputy dean, sion hospital)अटक करण्यात आली आहे.
राकेश रामनारायण वर्मा (वय- 54 वर्षे) असं आरोपीचं नाव आहे. सायन रूग्णालय मेडीकल कॉलेजमध्ये सरकारी कोट्यातून MD ला अॅडमिशन देतो असं आमिष दाखवून आलिशा शेख (रा. मध्यप्रदेश) यांच्याकडून एकूण 50 लाख रुपये घेतले होते.
हेही वाचा...अयोध्येत उभ्या राहणाऱ्या मशिदीचे आर्किटेक्ट आहेत हे प्राध्यापक अख्तर
मिळालेली माहिती अशी की, आलिशा शेख या या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल होती. आरोपी राकेश वर्मा याने 50 लाखांपैकी 21 लाख 10 हजार त्यांच्या बॅंक खात्यामार्फत घेतले होते. पण बराच पाठपुरावा करुन देखील आपले अॅडमिशन काही होत नाही, हे लक्षात आल्यावर आलिशा यांच्या फिर्यादीवरून सायन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार पोलिसांनी राकेश वर्मा यांची चौकशी केली आणि त्या चौकशीत त्यांनी सरकारी कोट्यातून अॅडमिशन मिळून देण्याचे आमिष दाखवल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी त्यानं 50 लाख रुपये स्वीकारल्याचे समोर आलं आहे.
तर दुसऱ्या एका घटनेत झारखंड येथील रहिवाशी श्रीमती राजीव रामनाथ पांडे (वय-46) यांनी देखील सायन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हिमाश शुक्ला, डॉ कौशीक मेहता, निखील व सतिष या चौघांनी मिळून लोकमान्य टिळक रूग्णालय, सायन मेडीकल कॉलेज येथे एमबीबीएस कोर्सला सरकारी कोट्यातून प्रवेश करून देतो, असे आमिष दाखवून रोख रक्कम 31 लाख 3 हजार 300 रुपये किंमतीचा एसव्हीजीएम, मुंबई यांचे नावाचा डीडी घेवून फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होता. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन माधव यादव (वय-26) उर्फ निखील श्रीवास्तव, विनय अरुण मिश्रा (वय- 28), सिद्दीकी आझम अकबर (वय-40) आणि राहुल कुमार सुधिरकुमार सिंग (वय-25) यांचा शोध घेऊन त्यांना नवी मुंबई येथून अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून एकूण 14 मोबाईल फोन, विविध कंपनीचे 26 सिमकार्ड, सायन रूग्णालय, केईएम रूग्णालय, एमबीटी मेडीकल कॉलेजचे बनावट शिक्के व बनावट प्रवेश अर्ज, बनावट ओळखपत्र, बनावट आधार कार्ड, विविध बॅंकांचे एकूण 30 डेबीट कार्ड गुन्ह्यांत वापरण्यात आलेली कार आणि विद्यार्थ्यांच्या याद्या असा मुददेमाल हस्तगत केला आहे.
हेही वाचा...तब्बल 10 तोळे सोने असलेली पर्स हॉटेलवर राहिली, त्यानंतर जे घडलं...
आरोपीतांची टोळी ही संपूर्ण भारतात कार्यरत असल्याची माहिती देखील चौकशीतून समोर आली आहे. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मुंबईचे अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उपआयुक्त विजय पाटील (परिमंडळ-4), सहाय्यक पोलिस आयुक्त (सायन विभाग) बी.एस. इंदलकर, वरिष्ट पोलीस निरीक्षक (सायन) श्रीमती ललीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक पोपळघट व पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडी, सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस निरीक्षक पाटील हे पुढिल तपास करत आहेत.