मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सिद्धिविनायक मंदिर पुढील काही दिवस बंद राहणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

सिद्धिविनायक मंदिर पुढील काही दिवस बंद राहणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन 4 रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई, 16 मार्च : जगभरात हाहाकार माजवलेला कोरोना व्हायरस महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसरू नये, म्हणून सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा तसंच विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारसोबतच विविध संस्थाही पुढे येत याबाबत उपाययोजना करत आहेत. अशातच सिद्धिविनाय मंदिर समितीनेही मोठं पाऊल उचलत पुढील काही दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद

इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता राज्यातील सर्व धार्मिक व सांस्कृतिक उत्सव रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यानी दिल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथिल तुळजाभवानी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर बंद होण्याची इतिहासात पहिलीच घटना आहे.

हे वाचा-एका क्लिकवर मिळवा कोरोनाबाबत अचूक माहिती, भारताने तयार केली खास वेबसाईट

मुंबई! कोरोनाचे आणखी 4 रुग्ण पॉझिटिव्ह

राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन 4 रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळत आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 37वर गेली आहे. मुंबईमध्ये तीन आणि नवी मुंबईत एक रुग्ण आढल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

हे वाचा- पुण्यात पहिला गुन्हा दाखल, कोरोनाची अफवा पसरवणं पडलं महागात

First published:

Tags: Corona