Home /News /mumbai /

सिद्धिविनायकाचं दर्शन 5 दिवस बंद राहणार, हे आहे कारण

सिद्धिविनायकाचं दर्शन 5 दिवस बंद राहणार, हे आहे कारण

दरवर्षी अशा प्रकारचं शेंदूर लेपण केलं जात असतं त्या काळात गभाऱ्यात असलेल्या मुख्य मूर्तीचं दर्शन बंद ठेवण्यात येतं असतं.

    मुंबई 09 जानेवारी : लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दररोज असंख्य भाविक येत असतात. नेते, अभिनेते, उद्योगपती, असे अनेक गणमान्य मंडळीही गणेशाच्या दर्शनाला येत असतात. येत्या 25 जानेवारी पासून माघी गणेशोत्सव सुरू होतोय. त्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सिद्धीविनायक मंदिरातील गणेश मूर्तीचं शेंदूर लेपण केलं जाणार आहे. त्यामुळे दिनांक 15 ते 19 जानेवारीपर्यंत गणेशभक्तांना गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाहीये. दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता सिद्धीविनायक मूर्तीची विधिवत पूजा झाल्यानंतर गणेशभक्तांना गाभाऱ्यातून दर्शन सुरू होणार आहे. या काळात सिद्धिविनायकाच्या प्रतिमूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे. दरवर्षी अशा प्रकारचं शेंदूर लेपण केलं जात असतं त्या काळात गभाऱ्यात असलेल्या मुख्य मूर्तीचं दर्शन बंद ठेवण्यात येतं असतं. त्या काळात गेणेशाची दुसरी मूर्ती भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विशेष पूजा केली जाते आणि त्यानंतर पुन्हा नेहमी प्रमाणे दर्श सुरू होतं.  
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Siddhivinayak Temple

    पुढील बातम्या