मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /वाहन चालकाचा माज; कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसासोबत घडला धक्कादायक प्रकार, Video Viral

वाहन चालकाचा माज; कारवाईदरम्यान वाहतूक पोलिसासोबत घडला धक्कादायक प्रकार, Video Viral

त्यावेळी हुंडाई क्रेटा कारला हात दाखवून रोखण्यासाठी सांगण्यात आलं, मात्र तो थांबण्याऐवजी पळ काढू लागला.

त्यावेळी हुंडाई क्रेटा कारला हात दाखवून रोखण्यासाठी सांगण्यात आलं, मात्र तो थांबण्याऐवजी पळ काढू लागला.

त्यावेळी हुंडाई क्रेटा कारला हात दाखवून रोखण्यासाठी सांगण्यात आलं, मात्र तो थांबण्याऐवजी पळ काढू लागला.

मुंबई, 30 सप्टेंबर : मुंबईतील अंधेरी आझाद नगर (Mumbai Andheri) मेट्रो स्टेशनजवळ आज सकाळी 11 वाजता, जेपी रोडवर एक वाहतूक पोलीस हवालदार (Traffic Police) आपल्या टीमसह कारवाई करीत होता. त्यावेळी हुंडाई क्रेटा कारला हात दाखवून रोखण्यासाठी सांगण्यात आलं, मात्र तो थांबण्याऐवजी पळ काढू लागला. ज्यानंतर वाहतूक पोलीस कारच्या बोनेटवर बसला आणि कार चालकाला बाहेर येण्यास सांगू लागला. तोपर्यंत मोठी गर्दी जमा झाली होती. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाला आहे.

वाहतूक पोलीस वारंवार कार चालकाला खाली उतरण्याची विनंती करीत होता. मात्र कार चालक खाली उतरण्याऐवजी बोनेटवर बसलेल्या वाहतूक पोलिसासह जलद गतीने कारला चालवत होता. आणि काही वेळ गेल्यानंतर हवालदार खाडी पडला. त्यानंतर संधी साधत गाडी चालकाने गाडी मागे फिरवली आणि तेथून फरार झाला.

हे ही वाचा-धरणात बुडत होता तरुण, महिलांनी ओढणीने खेचून वाचवला जीव, पाहा सुटकेचा थरारक VIDEO

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, कारच्या बोनेटवर बसलेले ट्रॅफिक कॉन्स्टेबलचं नाव विजयसिंह गुरव आहे. विजयसिंह आपली ड्यूटी करीत होता, मात्र कार चालकाने गाडी रोखण्याऐवजी जलद गाडीवरुन वाहतूक पोलिसाला खाली पाडलं व तेथून फरार झाला.

घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला, पोलिसांनी आरोपी चालकविरोधात आयपीसी कलम 353,279,336 सह साथ 184 अंतर्गत गुन्हा दाखल केला करीत चालकाला डिटेन करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Mumbai, Shocking viral video, Traffic police