News18 Lokmat

कांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या

शिवसेनेचे उपशाखा प्रमुख सचिन सावंत यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2018 04:31 PM IST

कांदिवली शिवसेनेचे उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या

मुंबई,ता.22 एप्रिल: शिवसेनेचे उपशाखा प्रमुख सचिन सावंत यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. कांदिवली ईस्ट च्या आकुर्ली रोडवर रात्री ही घटना घडली.

बाईकवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी सावंत यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या सावंत यांना कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

व्यावसायीक वादातून ही हत्या झाली असावी असा प्रार्थमीक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या आधी अहमदनगर आणि भीवंडीत शिवसेना नेत्यांची हत्या झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2018 10:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...