S M L

शिवस्मारकाचं काम एल अँड टी कंपनीला !

दरम्यान, शिवस्मारकाचं काम 3 वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय.

Sachin Salve | Updated On: Mar 1, 2018 11:25 PM IST

शिवस्मारकाचं काम एल अँड टी कंपनीला !

01 मार्च : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारणीचं काम एलअँडटी या कंपनीला देण्याचं मंजूर झालंय.

या स्मारक उभारणासाठी मागवण्यात आलेल्या 3 निविदांपैकी एल अँड टी कंपनीनं 2500 कोटींची निविदा भरली होती.  एलअँडटी या कंपनीला सरकारकडून मंजुरी मिळाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषेत दिली.

दरम्यान, शिवस्मारकाचं काम 3 वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय.

एल अँड टी कंपनीची सर्वात कमी निविदा ही 3 हजार 860 कोटींची होती. तर राज्य सरकारनं फक्त अडीच हजार कोटींची स्मारकासाठी तरतूद केलीय. त्यामुळे काही परवानग्या मिळूनही शिवस्मारकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. निविदांचा पेच टाळण्यासाठी सरकारनं मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यांची समिती नेमली होती. अखेर समितीने एल अँड टी कंपनीला मंजुरी दिली.

असं असणार शिवस्मारक

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2018 11:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close