मुंबई, 24 ऑक्टोबर : कोरोनाच्या काळात मुंबईच्या रुग्णालयातील धक्कादायक आणखीन एक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणा समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवडी इथली टीबी रुग्णालयात 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. या रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू होते. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
4 ऑक्टोबरपासून 27 वर्षीय तरुण सूर्यभान तेजबहादूर यादव हा रुग्णालयातून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आणि रुग्णालय प्रशासनानं पोलिसांकडे तक्रार दाखल केली. 14 दिवस उलटले तरी रुग्णाचा पत्ता नाही. पोलिसांनाच त्यानंतर सूर्यभानचा मृतदेह बाथरुममध्ये असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी तातडीनं रुग्णालयात दाखल होऊन तपासणी केली.
हे वाचा-जून 2021 पर्यंत कोरोनावर स्वदेशी लस उपलब्ध होणार, भारत बायोटेक कंपनीचा दावा
रुग्णालयाचा निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. 18 ऑक्टोबरला पोलिसांना कळलं की बाथरूम मध्ये मृतदेह सापडला आहे. 14 दिवस रुग्णालयाच्या बाथरूममध्ये मृतदेह पडूनच होता मात्र कोणालाही याचा पत्ता ही लागला नाही. त्यामुळे मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सूर्यभान यादव याच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.