पंतप्रधानपदासाठी शिवसेना देणार ‘या’ नेत्याला पाठिंबा

पंतप्रधानपदासाठी शिवसेना देणार ‘या’ नेत्याला पाठिंबा

शिवसेनेने पंतप्रधानपदासाठी चक्क भाजपच्या एका नेत्याला पाठिंबा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजप सोबत कोणत्याही प्रकारची युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंपासून ते अन्य नेते केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. अशातच आता शिवसेनेने पंतप्रधानपदासाठी चक्क भाजपच्या एका नेत्याला पाठिंबा दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. त्रिशंकू परिस्थितीत भाजपचे नेते नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतील. अशा परिस्थितीत शिवसेना गडकरींना पाठिंबा देईल, असे पक्षाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. शिवसेनेसोबत युती होईल, असे फक्त भाजपला वाटते आम्हाला नाही असे ही राऊतांनी स्पष्ट केले.

केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासूनच शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर शिवसेनेने मोदी आणि फडणवीस सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. राफेल विमान खरेदी प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याच्या काँग्रेसच्या मागणीला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.

न्यूज18 लोकमत Exclusive : नारायण राणेंची अनकट मुलाखत

First published: January 23, 2019, 10:33 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading