धक्कादायक! मुंबईत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटमधून मराठी अभिनेत्रीची सुटका

धक्कादायक! मुंबईत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटमधून मराठी अभिनेत्रीची सुटका

अंधेरी पूर्वेकडील 3 स्टार हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला आहे.

  • Share this:

मुंबई,  25 ऑक्टोबर : अंधेरी पूर्वेकडील 3 स्टार हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. सलग दुसऱ्या घटनेमध्ये मनोरंजन विश्वातील अभिनेत्री या रॅकेटमध्ये अडकल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच छापा टाकून हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश आलं आहे. यादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. मुंबई पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे. त्यापैकी एक अभिनेत्री ही हिंदी टीव्ही मालिकांमध्ये तर दुसरी मराठी मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री होती अशी माहिती समोर आली आहे.

गेल्या 15 दिवसांमधली मुंबईतली ही तिसरी घटना असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेश्या व्यवसाय करण्यासाठी भाग पडणाऱ्या महिलेला अटक केल्याची माहिती मिळाली आहे. कांदीवली पूर्व परिसरात ही महिला टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सी सोबतच सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केलं आणि हे रॅकेट चालवणाऱ्या 29 वर्षीय महिलेला या प्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.

हे वाचा-धक्कादायक! मुंबईच्या रुग्णालयातील बाथरुममध्ये आढळला मृतदेह, BMCकडून गंभीर दखल

गोरेगावमध्ये 5 स्टार हॉटेल्समध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गोरेगावमधील 5 स्टार हॉटेलमध्ये पोलिसांनी वेशांतर केलं आणि ग्राहक म्हणून या ठिकाणी सापळा रचला आणि इथे चालू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या हॉटेलमध्ये देहव्यापार आणि सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी वेश बदलून सापळा रचला आणि या संपूर्ण घटनेचा भांडाफोड केला.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 25, 2020, 9:11 AM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या