मुंबई, 12 सप्टेंबर: मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा झालेला याकूब मेमन याच्या कबरीची जागा विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस अधिकाऱ्यानं शनिवारी दिलेली माहिती अशी की, याकूब मेमन याला नागपूर येथील मध्यवर्ती तुरूंगात फासावर लटकावण्यात आलं होतं. नंतर याकूब मेमन याचं पार्थिव 30 जुलै 2015 रोजी दक्षिण मुंबईतील मरीन लाइन येथील बडा कब्रस्थानमध्ये दफन करण्यात आलं होतं.
हेही वाचा...मी पुन्हा येईन... असं सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी अधिकाऱ्यांना खडसावलं
पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, याकूब मेमन याला दफन करण्यात आलेली कब्रस्थानची जागा विकण्यात आल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. मेमन याच्या एका नातेवाईकानं मार्च महिन्यात लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दिली होती. मेमनच्या नातेवाईकाचं म्हणणं आहे की, मेमनच्या कुटुंबातील सदस्यांसाठी कब्रस्थानमध्ये कबरीसाठी सात जागा देण्यात आल्या आहेत. याकूब मेमनशिवाय त्याच्या कुटुंबातील इतर तीन जणांच्या कबरीच्या जागा पाच लाख रुपयांत विक्री करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी, दोन आरोपींविरुद्ध भादंवि कलम 465, 468 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीमध्ये जुमा मशीद ऑफ मुंबईचा ट्रस्टी आणि प्रबंधकाचा समावेश आहे. याच ट्रस्टच्या नावानं मुस्लिम बडा कब्रस्थानची नोंदणी करण्यात आली आहे.
हेही वाचा...खूपच भयंकर! संतापलेल्या मॅनेजरनं कर्मचाऱ्याच्या बोटाचा तुकडाच पाडला
पोलिसांनी आता या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. हुद्द्यानं चार्टर्ड अकाऊंटंट याकूब मेमन याला 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. नागपूर येथील मध्यवर्ती तुरूंगात फासावर लटकावण्यात आलं होतं. नंतर याकूब मेमन याचं पार्थिव 30 जुलै 2015 रोजी दक्षिण मुंबईतील मरीन लाइन येथील बडा कब्रस्थानमध्ये दफन करण्यात आलं होतं. साखळी बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी टायगर मेमनचा तो धाकटा भाऊ होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.