मुंबई, 19 ऑक्टोबर : नौदलाच्या मटेरियल ऑर्गनाइज़ेशन (डिपो)defence security cops मध्ये तैनात असलेल्या शिपायाला गोळी लागल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून तातडीनं पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहाणी केली असून शिपायाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील घाटकोपर परिसरात रविवारी रात्री 8 च्या सुमारास हा प्रकार घडला. ड्युटीवर असताना दोन राऊंड फायर झाल्याचा आवाज आला आणि त्यानंतर रायपाल खाली कोसळलेले दिसले. defence security cops मध्ये 45 वर्ष सेवा केलेल्या रायपाल सिंह यांना अचानक गोळी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. ही गोळी त्यांच्याच रायफलमधून चालली होती अशी माहिती मिळाली आहे. ही आत्महत्या आहे की चुकून रायफलमधून गोळी सुटली याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.
Sepoy Raipal Pal Singh, of the 106 DSC platoon attached to Material Organisation, Ghatkopar, Mumbai was found dead, at his duty post today, due to gunshot injury. His service rifle with 2 rounds discharged was found next to him: Defence PRO, Mumbai. #Maharashtra
रायपाल सिंह यांच्यासोबत घडलेल्या या घटनेमुळे आत्महत्या असल्याची चर्चा होत आहे. आत्महत्या आहे तर यामागचं कारण काय? चुकून गोळी सुटली का? याबाबत सध्या पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. रायपाल 45 वर्षांपासून नेव्ही मध्ये गार्ड म्हणून कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रायपाल हे मुळचे पंजाबच्या संगरुर परिसराचे रहिवासी होते. त्यांच्यामागे पत्नी आणि त्यांची दोन मुलं असं कुटुंब आहे. रायपाल यांचा मृतदेह नौदलाच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल कऱण्यात आला आहे. त्या अहवालानंतर पोलीस तपासाची पुढची दिशा ठरवतील अशी माहिती मिळाली आहे.