Home /News /mumbai /

मुंबईतील शाळाही लवकरच चालू होणार; मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितला हा फॉर्म्युला

मुंबईतील शाळाही लवकरच चालू होणार; मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितला हा फॉर्म्युला

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यात याबाबत चर्चा झाली असून शाळा सुरू करण्याबाबत आराखडा तयार केला आहे.

  मुंबई, 26 सप्टेंबर : राज्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू होत असल्याने आता मुंबईतील शाळाही (Mumbai Schools to reopen) लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यात याबाबत चर्चा झाली असून शाळा सुरू करण्याबाबत आराखडा तयार केला आहे. मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, मुंबईतील शाळा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व शाळांचं सॅनिटाईजेशन करण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांचं लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. आत्तापर्यंत जवळपास 76 टक्के शिक्षकांचं लसीकरण झालं आहे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल त्या ठिकाणी एसओपीचं पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी त्याबाबतची माहिती दिल्याचे मंत्री गायकवाड यांनी सांगितले. हे वाचा - Mumbai School Reopen: मुंबईतील शाळा सुद्धा सुरू होणार? महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या अडीच वर्षांपासून शाळा बंद होत्या. अखेर 4 ऑक्टोबरपासून शाळा (Maharashtra school reopen from 4 October) सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण, 'विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याची सक्ती नाही. पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये, कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी अगोदरच स्पष्ट केलं आहे. राज्यातील शाळा अखेर सुरू (Maharashtra School reopen) करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची 24 सप्टेंबरला मान्यता मिळाली आहे. हे वाचा - वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकला सून हवीय; त्याच्या अटी वाचून मुली म्हणाल्या… आजारी विद्यार्थी कसा शोधावा याची माहिती शिक्षकांना दिली आहे. त्यानुसार, शाळेत सुद्धा योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे, असंही गायकवाड म्हणाल्या. मुंबई लोकल प्रवास हा दोन डोस पूर्ण झालेल्या व्यक्तींना सुरू आहे. स्थानिक पातळीवर शिक्षकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी आयुक्तांनी निर्णय घ्यायचा आहे. म्हणून शहरी भागात आयुक्तांना यात समावेश केला, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Coronavirus, School, Varsha gaikwad

  पुढील बातम्या