S M L

गाड्या सोडून द्या, महसूलमंत्र्यांच्या दालनातून वाळू माफियाचा फोन !

चंद्रकांत पाटील हे आपल्या अँटी चेंबरमध्ये व्यस्त असताना वाळू तस्कराने हा प्रताप केलाय.

Sachin Salve | Updated On: Jun 16, 2018 10:40 PM IST

गाड्या सोडून द्या, महसूलमंत्र्यांच्या दालनातून वाळू माफियाचा फोन !

अहमदनगर,16 जून : वाळू तस्करी करताना गाडी पकडलीये ती नाममात्र दंड करून गाडी सोडून देण्याचे आदेश आहे असा फोन थेट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून करण्याचा प्रताप एका वाळू तस्कराने केलाय.

मंत्रालयातून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनातून कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांना फोन करून पकडलेल्या वाळूच्या गाड्याना नाममात्र दंडकरून सोडून द्या असे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत, असा फोन वाळू तस्करांनी केला.

जवान तुझे सलाम,तब्बल 30 किमीपर्यंत हर्षदचा मृतदेह खांद्यावर आणला वाहून !


चंद्रकांत पाटील हे आपल्या अँटी चेंबरमध्ये व्यस्त असताना वाळू तस्कराने हा प्रताप केलाय.  संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या वाळू तस्काराचा प्रताप उघडकीस आणलाय.

VIDEO : कचरा टाकणाऱ्याला अनुष्काने शिकवला धडा, विराटने शेअर केला व्हिडिओ

याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्ष टिळक भोस यांनी लेखी तक्रार केली आहे. तसंच मंत्रालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते निदर्शनास आले आहे.

Loading...
Loading...

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 16, 2018 10:40 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close