• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • साकीनाका बलात्कार प्रकरण: पीडितेची प्रकृती चिंताजनक, मृत्यूशी झुंज सुरू

साकीनाका बलात्कार प्रकरण: पीडितेची प्रकृती चिंताजनक, मृत्यूशी झुंज सुरू

Mumbai Sakinaka Rape case news: मुंबईतील साकीनाका परिसरात महिलेवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:
मुंबई, 11 सप्टेंबर : दिल्लीतील नर्भया प्रमाणेच मुंबईतील साकीनाका (Mumbai Sakinaka rape case) परिसरात घटना घडली आहे. एका महिलेला बेदम मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. इतकेच नाही तर आऱोपीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पीडित महिला अद्यापही बेशुद्धावस्थेत आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पीडित महिलेची प्रकृती खूपच चिंताजनक (victims condition critical) असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. पीडित महिलेच्या प्रकृतीची चौकशी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयात जाऊन केली. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली की, पीडित महिलेची प्रकृती खूपच चिंताजनक आहे, अत्यावस्थ अवस्थेत पीडिता आहे. पीडित महिलेसोबत तिची आई आहे. पीडितेच्या आईने सांगितले की, गेली 10-12 वर्षांपासून जो इसम टेम्पोजवळ सापडला त्याच्यासोबत राहत होती आणि त्यांच्यात वारंवार भांडणे सुद्धा होत होती. त्यांच्यात सुरू असलेल्या भांडणाबाबत एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन सांगितले. मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती, तपासात समोर आली धक्कादायक माहिती ज्यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी पीडित महिला रक्तबंबाळ अवस्थेत टेम्पोत आढळून आली. पीडितेच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाली आहे. पीडितेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी मोहन चौहान याला अटक करण्यात आली आहे. पीडितेला 13 आणि 16 वर्षांची अशा दोन मुली आहेत, ज्या पीडितेच्या आई बरोबर राहत आहेत. पीडित महिला ही आरोपीसोबत राहत होती अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. पीडित महिलेची प्रकृती खूपच चिंताजनक आहे. पीडिता व्हेंटिलेटरवर असून तिच्यावर उपचारासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. इतकी क्रुरता पुरुषांमध्ये का आणि कशी येते? असा प्रश्न आहे. सर्वांना भय वाटणं स्वाभाविकच आहे. आरोपी हा ड्रग्ज अॅडिक्ट आहे का याचाही तपास सुरू आहे.
Published by:Sunil Desale
First published: