Home /News /mumbai /

Sakinaka Rape Murder Case: साकीनाका बलात्कार-हत्या प्रकरण; दोषीला फाशी देण्याची मागणी, आज कोर्ट देणार निकाल

Sakinaka Rape Murder Case: साकीनाका बलात्कार-हत्या प्रकरण; दोषीला फाशी देण्याची मागणी, आज कोर्ट देणार निकाल

Mumbai Rape and Murder case: साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यानंतर मोहन चौहान याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारकडून करण्यात आली.

    मुंबई, 2 जून : मुंबईतील साकीनाका परिसरात गेल्यावर्षी झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे (Mumbai Sakinaka rape and murder case) एकच खळबळ उडाली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवघ्या काही तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर अवघ्या 18 दिवसांत आपला तपास पूर्ण करत पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणाच्या सुनावणीत दिंडोशी कोर्टाने (Court) आरोपी मोहन चौहान (Mohan Chouhan convicted) याला दोषी ठरवलं. कोर्टाने दोषी ठरवल्यावर अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ हे प्रकरण असल्याचं सांगत राज्य सरकारकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी कोर्टात करण्यात आली. या प्रकरणी कोर्ट आज आपला फैसला सुनावणार आहे. मुंबईतील दिंडोशी कोर्टात या प्रकरणी सोमवारी युक्तिवाद झाला. त्यानंतर कोर्टाने आरोपीला दोषी ठरवलं. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारकडून करण्यात आली आहे. त्यावर दिंडोशी कोर्ट आपला निर्णय आज देणार आहे. नेमकं काय आहे प्रकरण? गेल्यावर्षी (2021) मुंबईत एका महिलेसोबत नवी दिल्लीतील निर्भया प्रमाणे भयावह प्रकार घडल्याचं वृत्त समोर आलं. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. मुंबईतील साकीनाका परिसरातील आहे. येथे एका आरोपीने महिलेवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातला. या बाबात माहिती मिळताच आरोपीला अटक करण्यात आली. या घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली होती. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital Mumbai) पीडित महिलेवर उपचार सुरू होते. पीडित महिला अद्यापही बेशुद्धावस्थेत होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पीडित महिलेची प्रकृती खूपच चिंताजनक होती. पीडितेवर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते मात्र, दुर्देवाने तिचा मृत्यू झाला. सैतानालाही लाजवेल असं कृत्य आरोपीने केलं होतं. पीडित महिलेला मारहाण करुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता. इतकेच नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकून गंभीर दुखापत केली होती. आरोपीने भररस्त्यात उभ्या असलेल्या टेम्पोत हे कृत्य केलं होतं आणि त्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Mumbai, Murder, Rape

    पुढील बातम्या