डिलिव्हरीसाठी पाठवलेल्या महागड्या वस्तू अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी केल्या लंपास!

या प्रकरणात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यत चार जणांना अटक केली आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Feb 16, 2018 09:18 AM IST

डिलिव्हरीसाठी पाठवलेल्या महागड्या वस्तू अमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनी केल्या लंपास!

16 फेब्रुवारी : अमेझॉन ऑनलाईन कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना डिलिव्हरीसाठी पाठवलेले महागडे मोबाईल, लॅपटॉपवर लाखोंचा डल्ला मारण्यात आला आहे. अमेझॉन आणि डिलिव्हरी डॉट कॉम कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपसात संगनमत करून लाखोंच्या मोबाईल, लॅपटॉपवर डल्ला मारल्याचे भिवंडी गुन्हे शाखेने उघड केल्याने या दोन्ही कंपनीच्या कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यत चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी डिलिव्हरी डॉट कॉममधील कर्मचारी उमेश गुळवी, टेम्पो चालक हुसैन रफिकुद्दीन, अमेझॉन कंपनीचे माजी कर्मचारी संदीप सराफ, सचिन पटाळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यामुळे आता ऑनलाईन शॉपिंग तरी करावी का? असा सवाल आता ग्राहकांकडे आहे.

पोलिसांनी या सगळ्या भामट्यांकडून ५७ मोबाईल, ३ लॅपटॉप असा पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे ग्राहकांचीही यातून फसवणूक केली जातेय का? हे बघणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2018 09:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...