S M L

आधुनिक चोर, कॉन्फरन्स कॉलद्वारे करायचे घरफोड्या आणि आता...!

एखादं बंद घर हेरल्यानंतर या टोळीचे चार जण सँट्रो कार घेऊन घरफोडी करायला जायचे. तर...

News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2018 07:55 AM IST

आधुनिक चोर, कॉन्फरन्स कॉलद्वारे करायचे घरफोड्या आणि आता...!

मुंबई, 10 जुलै : दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या एका सराईत टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिटने जेरबंद केलं आहे. ही टोळी घरफोडी करताना कॉन्फरन्स कॉलद्वारे एकमेकांच्या संपर्कात असायची, अशी माहिती समोर आली आहे. अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापुरात घरफोडीच्या घटना वाढल्यानं गुन्हे शाखेनं या घटनांचा समांतर तपास सुरू केला होता. यादरम्यान झुल्फिकार उर्फ राजू हसमत अली इंद्रिसी आणि ब्रिजेशकुमार जगतपाल गुप्ता हे दोघे गुन्हे शाखेच्या हाती लागले.

यात चौकशी दरम्यान त्यांनी तब्बल 29 घरफोड्या केल्याची कबूली दिली आहे. एखादं बंद घर हेरल्यानंतर या टोळीचे चार जण सँट्रो कार घेऊन घरफोडी करायला जायचे. त्यापैकी दोघे प्रत्यक्ष घरफोडी करायचे, तर एक जण इमारतीच्या आवारात आणि एक जण कारमध्ये बसून लक्ष ठेवायचा.

LIVE : मुंबईत आजही मुसळधार पाऊस, डबेवाल्यांची सेवा बंदयादरम्यान हे सगळे कॉन्फरन्स कॉलद्वारे एकमेकांच्या संपर्कात असायचे. चोरी करून झाल्यावर लगेच कारने ते तिथून पसार व्हायचे. अखेर गुन्हे शाखेनं या घरफॉड्यांचा छडा लावलाय. अटक केलेला आरोपी झुल्फिकार इद्रिसी हा सराईत चोरटा असून त्याच्यावर यापूर्वी मुंबई, नवी मुंबईसह राज्यभरात २० गुन्हे दाखल आहेत. ऑर्थर रोड आणि तळोजा कारागृहातही तो जेरबंद होता. तर नुकताच ठाणे कारागृहातून तो जामिनावर बाहेर आला होता.

या टोळीकडून गुन्हे शाखेनं सँट्रो कारसह तब्बल साडेचार किलो सोनं हस्तगत केलंय. या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय.

हेही वाचा...

Loading...

'या' क्रमांकावरुन फोन काॅल आला तर फोन उचलू नका,बॅलेन्स होईल शुन्य...

पाकिस्तानातल्या एका व्हिडिओनं भारतात घेतला 30 जणांचा बळी

VIDEO : छगन भुजबळ पुन्हा आक्रमक, विधानसभेत मुनगंटीवारांसोबत जुगलबंदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2018 07:55 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close