Home /News /mumbai /

मुंबईत भीषण अपघात, डंपर चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले

मुंबईत भीषण अपघात, डंपर चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले

मुंबईतल्या जोगेश्वरी येथे झालेल्या अपघातात वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मुंबई, 29 डिसेंबर : डंपर चालकाच्या निष्काळजीपणामुळे मुंबईतल्या जोगेश्वरी येथे झालेल्या अपघातात वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पांडुरंग सकपाळ असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पोलीस नाईक पांडुरंग सकपाळ आणि त्यांचा वॉर्डन सहकारी भावेश पितळे हे मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पश्चिम महामार्गावर हब मॉलच्या समोर आपल्या अ‍ॅक्टिव्हा स्कुटरने कर्तव्य बजावण्यासाठी जात होते. त्यावेळी डंपर चालक मुन्नाकुमार चव्हाण हा भरधाव वेगाने डंपर घेऊन त्यांच्या मागून येत होता. त्याने आपल्या डंपरने सकपाळ यांच्या स्कुटरला जोरदार धडक दिली. यात दोघेही खाली पडले आणि सकपाळ यांच्या अंगावरून डंपर गेले. या अपघाताची माहिती जोगेश्वरी पोलिसांना मिळाल्यावर जखमी असवस्थेत दोघांना नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी पांडुरंग सकपाळ यांना मृत घोषित केले, तर वार्डन पिटले यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले. ही घटना घडल्यावर डंपर चालक मुन्नाकुमार चव्हाण हा डंपर सोडून या दोघांना मदत न करता पळून गेला होता. ही घटना वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने पोलीस घटनास्थळी पोहचले आणि डंपर ताब्यात घेऊन चालकांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रात्री मुन्नाकुमार याला अटक केली. पांडुरंग सकपाळ हे दिंडोशी वाहतूक पोलीस विभागात कार्यरत असल्याने वरिष्ठांनी या घटनेविषयी दुःख व्यक्त केले.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Mumbai, Road accident

पुढील बातम्या