Home /News /mumbai /

मुंबईत माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी घरात घुसून केली मारहाण, उद्धव ठाकरेंवरील कार्टून फॉरवर्ड केल्याचा राग

मुंबईत माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी घरात घुसून केली मारहाण, उद्धव ठाकरेंवरील कार्टून फॉरवर्ड केल्याचा राग

शिवसेनेचे 2 शाखा प्रमुख आणि 7-8 शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

    मुंबई, 11 सप्टेंबर : कांदिवली इथे राहणारे माजी नौदल अधिकारी मनोज शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर असलेलं व्यंगात्मक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून त्यांच्या घरात घुसून शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेचे 2 शाखा प्रमुख आणि 7-8 शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. या हल्ल्याचा आपण निषेध करत असून अशा गुंडागर्दीमुळे महाराष्ट्र आणि मुंबईतील जनता आपला आवाज गप्प करणार नाही असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे. मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तींवर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. ताज्या माहितीनुसार, याप्रकरणी 4 शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 2 शाखाप्रमुखांचा तर अन्य 2 कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'दु:खद आणि धक्कादायक घटना. व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे काही गुंडांनी एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. उद्धव ठाकरेजी कृपया हा गुंडाराज थांबवा. या गुंडांवर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी आमची मागणी आहे,' असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दरम्यान, याआधीच कंगना प्रकरणात BMC ने तिचं ऑफिस तोडल्याने सत्ताधारी शिवसेनेवर टीका होत असतानाच हे नवीन प्रकरण समोर आल्यानं शिवसेनेची अडचण झाली आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: BJP, Shivsena

    पुढील बातम्या