मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; गेल्या तीन आठवड्यांत सर्वात कमी रुग्णांची नोंद

मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; गेल्या तीन आठवड्यांत सर्वात कमी रुग्णांची नोंद

तर मुंबईच्या 4 विभागांमध्ये या दराने 300 दिवसांचा टप्पा गाठला आहे.

तर मुंबईच्या 4 विभागांमध्ये या दराने 300 दिवसांचा टप्पा गाठला आहे.

Covid-19 in Mumbai: मुंबईकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. कारण गेल्या तीन आठवड्यांत आज मुंबईत सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 24 एप्रिल: कोरोना विषाणूची दुसरी लाट (Coronavirus 2nd wave) त्सुनामीसारखी देशभरात आली आहे. अनेक राज्यांत कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने कोरोना बाधितांचा मृत्यूही होत आहे. दिवसभरात धडकी भरवणाऱ्या अनेक बातम्या येत आहेत. मात्र, त्याच दरम्यान मुंबई (Mumbai)तून एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कठोर निर्बंध लागू करण्यात आल्यावर मुंबईतील कोरोना आकडेवारीत घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे.

गेल्या 24 तासांत मुंबईत 5888 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर याचवेळी 8549 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 85 टक्के इतका आहे. सध्यस्थितीत मुंबईत 78,775 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईतील 529,233 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आपल्याला सांगू इच्छितो की, मुंबईत आज नव्याने नोंद झालेल्या रुग्णांची संख्या ही गेल्या तीन आठवड्यांत सर्वात कमी आहे. 31 मार्च 2021 रोजी मुंबईत 5394 रुग्णांची नोंद झाली होती. तर 12 एप्रिल 2021 रोजी मुंबईत तब्बल 7 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती.

गेल्या 24 तासांत 71 मृत्यू

मुंबईत केल्या 24 तासांत कोरोनामुळे 71 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज 5888 बाधितांची नोंद झाली आहे त्यामुळे मुंबईतील एकूण बाधितांची संख्या 622109 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 5,29,233 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी मुंबईत 7221 रुग्णांची नोंद झाली होती तर 72 जणांचा मृत्यू झाला होता. तर गुरुवारी 75 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

वाचा: Covid-19 Vaccine Free: महाराष्ट्रातील जनतेला मोफत लस देणार? पाहा अजित पवार काय म्हणाले

आदित्य ठाकरे यांचं ट्विट

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन मुंबईतील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाण वाढल्याने चांगले संकेत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं, आज नवीन बाधितांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र इतके पुरेसे नाहीये. आपण घरी रहा, मास्क लावा आणि सुरक्षित राहा.

महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी

आज राज्यात 63,818 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 34,68,610 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 82.02 टक्के इतका आहे. आज राज्यात 67,160 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील मृत्यू दर 1.51 टक्के इतका आहे.

First published:

Tags: Coronavirus, Mumbai