• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • पावसाळी आजारांमुळे वाढला मुंबईकरांचा ताप; डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

पावसाळी आजारांमुळे वाढला मुंबईकरांचा ताप; डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

तिसऱ्या लाटेचं (Third Wave) सावट असताना मुंबईच्या (Mumbai pike in Dengue) डोक्यावर आता नवं संकट घोघावतंय.

 • Share this:
  मुंबई, 02 सप्टेंबर: कोरोनाच्या (Corona Virus) तिसऱ्या लाटेचं (Third Wave) सावट असताना मुंबईच्या (Mumbai pike in Dengue) डोक्यावर आता नवं संकट घोघावतंय. मलेरिया (Malaria) , डेंग्यू (Dengue) , गॅस्ट्रो या आजारांचा ताप मुंबईमध्ये वाढला आहे. सद्य परिस्थितीत मुंबई (Mumbai City) शहरात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वेगानं वाढ होत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल होण्याची रुग्णांची सख्या वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून (BMC) नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, डेंग्यूची पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर 132 पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईत मलेरियाचे 790 रुग्ण सापडले. यावर्षी शहरात आतापर्यंत डेंग्यूच्या एकूण 209 रुग्णांची नोंद केली आहे. जानेवारी ते ऑगस्टदरम्यान मलेरियाच्या 3338 रुग्णांची नोंद केली आहे. तसंच गेल्या आठ महिन्यात गॅस्ट्रोच्या 1848 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. भारतावर दहशतवादी हल्ल्याचं सावट, गुप्तचर यंत्रणांनी जारी केला अलर्ट टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार बीएमसीने म्हटले आहे की, बहुतेक रुग्ण हे एफ दक्षिण (परेल, शिवडी, नायगाव), बी (डोंगरी, उमरखाडी) आणि एच पश्चिम (वांद्रे, खार आणि सांताक्रूझ) येथे आढळून आली आहेत. मात्र या भागात मृत्यूची नोंद नाही आहे. मुंबईत जानेवारी महिन्यापासून ते ऑगस्टपर्यंतची रुग्णसंख्या मलेरिया -3338 लेप्टोस्पायरोसिस- 133 डेंग्यू- 209, गॅस्ट्रो -1848 काविळ-165 स्वाईन फ्लू - 45 ज्या भागात डेंग्यूचं रुग्ण आढळून आले आहेत त्या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून संबंधित भागात तात्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. कीटकनाशक विभागाने 13 लाख 15 हजार 373 घरांची पाहणी केली असून 11 हजार 492 डेंग्यू प्रजनन स्थळे नष्ट केली.
  Published by:Pooja Vichare
  First published: