(नितेश राणेंच्या पोलीस ठाण्यात येरझारा, सुप्रीम कोर्टात उद्या जामीनावर सुनावणी) मुंबईतील नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास केला तर 15 जानेवारीला 10 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर हळूहळू ही रुग्णसंख्या दररोज कमी झाली. 15 जानेवारीनंतर दुसऱ्याच दिवशी नव्या बाधितांच्या आकडेवारीत 2 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची कमी झाल्याचं बघाया मिळालं होतं. रुग्णांची कमी संख्या ही दररोज दोन हजारांच्या फरकाने कमी होऊ लागली होती. 21 जानेवारीला 5008 रुग्ण आढळले होते. त्यानंतर 22 जानेवारीला हाच आकडा 3568 वर पोहोचला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही आकडेवारी आणखी एक हजाराने खाली घसरली होती. मात्र, गेल्या दिवसांपासूनची आकडेवारी ही 1800 ते 1850 च्या दरम्यान बघायला मिळत आहे. ही आकडेवारी देखील लवकरच खाली घसरेल आणि मुंबईत कोरोना परिस्थिती पूर्णपणे सुधारेल, अशी आशा आहे. मुंबईतील गेल्या काही दिवसांपासूनची नवी रुग्णसंख्या (आकडेवारीत) 26 जानेवारी - 1858 25 जानेवारी - 1815 24 जानेवारी - 1857 23 जानेवारी - 2550 22 जानेवारी - 3568 21 जानेवारी - 5008 20 जानेवारी - 5708 19 जानेवारी - 6032 18 जानेवारी - 6149 17 जानेवारी - 5956 16 जानेवारी - 7895 15 जानेवारी - 10661#CoronavirusUpdates 26th January, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 1858 Discharged Pts. (24 hrs) - 1656 Total Recovered Pts. - 9,98,698 Overall Recovery Rate - 96% Total Active Pts. - 22364 Doubling Rate - 185 Days Growth Rate (19 Jan - 25 Jan)- 0.37%#NaToCorona — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 26, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.