Home /News /mumbai /

Mumbai Corona : मुंबईत कोरोना अंशत: वाढला, धोका खरंच टळलेला नाही?

Mumbai Corona : मुंबईत कोरोना अंशत: वाढला, धोका खरंच टळलेला नाही?

corona

corona

मुंबईत नव्या कोरोनाबाधितांची आकडेवारी घटत असल्याचं चित्र असताना आज एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

  मुंबई, 29 जानेवारी : मुंबईत नव्या कोरोनाबाधितांची आकडेवारी (Mumbai Corona Cases) घटत असल्याचं चित्र असताना आज एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 411 नवे कोरोनाबाधिता रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे काल हीच आकडेवारी 1 हजार 312 इतकी होती. कोरोनाबाधिताची नवी आकडेवारी ही कालच्या तुलनेने 99 आकड्यांनी जास्त आहे. त्यामुळे प्रशासनासासह मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा आहे. धोका अद्यापही टळलेला नाही हे यातून स्पष्ट होतंय. विशेष म्हणजे फक्त मुंबईतच नाही तर पुणे शहरातही (Pune Corona) हीच अवस्था आहे. पुण्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचं चित्र असतान प्रशासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर अवघ्या काही तासांत कोरोनाची चिंता वाढणारी नवी आकडेवारी समोर आली. पुण्यात आज दिवसभरात तब्बल 5 हजार 410 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 411 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 3 हजार 547 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतली सध्याची कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत आहे. कारण राज्यात सर्वात आधी मुंबईत कोरोनाची तिसरी लाट धडकली होती. कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक प्रचंड मोठी वाढ झाली होती. कोरोनाबाधितांची आकडेवारी दररोज वाढत होती. दररोज 20 ते 25 हजारापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते. अखेर ही लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आलं आहे. जितक्या गतीने लाट पुढे सरकली तितक्याच गतीने ही लाट खाली कोसळली. मुंबईत आज दिवसभरात 1312 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 5990 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पण आजची नवी रुग्णसंख्या अंशत: वाढली आहे. तसेच बरे होणाऱ्यांची संख्या ही कालच्या तुलनेत दोन हजारांनी कमी आहे. मुंबईत सध्या 12 हजार 187 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा 322 दिवसांवर पोहोचला आहे. तर कोविडचा दर हा (22 जानेवारी- 28 जानेवारी) 0.21 टक्क्यांवर पोहोचला आहे. धारावीत कोरोना नियंत्रणात? दरम्यान, मुंबईच्या धारावी परिसरांत काल (28 जानेवारी) शून्य कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. महापालिकेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार पहिल्या लाटेत धारावीत रुग्णसंख्या शून्य होईपर्यंत 269 दिवस लागले होते. तर दुसऱ्या लाटेत 119 दिवसांनंतर धारावीत रुग्णसंख्या शुन्य झाली होती. पण या तिसऱ्या लाटेत 31 दिवसांनंतर धारावीमध्ये रुग्णसंख्या शून्यावर पोहोचली आहे. याचाच अर्थ ही तिसरी लाट ओसरायला लागली असून हिचा कालावधी हा कमी दिवसांचा आहे, असं स्पष्ट होताना दिसत आहे. मुंबईत धारावी हा सर्वात मोठा झोपडपट्टी परिसर आहे. इथे प्रचंड दाटीवाटीची वस्ती आहे. त्यामुळे या परिसरात संसर्ग थोपविणं हे प्रशासनापुढे मोठं आव्हान होतं. धारावी पाठोपाठ दादरमध्ये आज दिवसभरात 3 रुग्णांची नोंद झाली आहे. तर माहिममध्ये 12 नव्या रुग्णांची नोंद झाली. (Box Office वर 83 आपटल्यानंतर रणवीरला मोठा धक्का! हे काम न करण्याचा केला निश्चय) पुण्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच पुण्यातील कोरोना रुग्णांची दैनंदिन रुग्णवाढ ही कमी झाल्याचं चित्र होतं. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं पाहून प्रशासनाने आज सकाळी शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय (Pune School Reopen) घेतला. पण हा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या काही तासात एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे. पुण्यात आज कोरोनाने पुन्हा एकदा डोकंवर काढल्याचं चित्र आहे. कारण पुण्यातील आजची नवी कोरोनाबाधितांची आकडेवारी ही चिंता वाढवणारी आहे. पुण्यात आज दिवसभरात तब्बल 5 हजार 410 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे काल ही आकडेवारी जवळपास साडे तीनहजार होती. पण हीच आकडेवारी आज दोन हजारांनी वाढली आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या निर्णय प्रशासन मागे घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार पुण्यात 1 फेब्रुवारीपासून शाळा-कॉलेज सुरु होणार आहेत.
   (कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, जागितक आरोग्य संघटनेची नवी माहिती) पुण्यात आज दिवसभरात 5 हजार 410 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच आज पुण्यात तब्बल 15 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये पुणे शहरातील 7 तर पुण्याबाहेरील 8 मृतकांचा समावेश आहे. पुण्यात सध्या 358 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. तर 51 रुग्ण हे इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर आणि 33 रुग्ण नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यातील सध्याची सक्रिय रुग्णसंख्या ही 33 हजार 528 इतकी आहे. दुसरीकडे पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी दररोज कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचीदेखील संख्या वाढू लागली आहे. पुण्यात आज दिवसभरात 8 हजार 215 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या