मुंबई,13सप्टेंबर: गुरूग्राम इथली रायन इंटरनॅशनल शाळेतील गैरप्रकारावर सगळ्या देशातून टीका होते आहे. पण याच संस्थेच्या मुंबईतल्या शाळेत दोन वर्षांपूर्वी गैरप्रकार झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
2 वर्षांपूर्वी मुंबईच्या शाळेत एका विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण झाल्याचं पुढे आलं आहे. सहा वर्षाच्या मुलांचं लैंगिक शोषण झाल्याप्रकरणी सेंट झेवियर्स शाळेच्या मुख्याध्यापकांना अटकही करण्यात आली होती. तेव्हा पालकांनी शाळेविरूद्ध निर्दशनंही केली होती .
रायन इंटनॅशनलच्या एकट्या महाराष्ट्रातच 100 हून अधिक शाळा आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा