• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • आता राणीच्या बागेतही वाघ आणि सिंहाची 'युती', कोण घेणार कोणाची काळजी?

आता राणीच्या बागेतही वाघ आणि सिंहाची 'युती', कोण घेणार कोणाची काळजी?

मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी 'सिंहाची काळजी वाघ घेईल' असं सूचक वक्त्यव्यही केलं.

 • Share this:
  उदय जाधव, प्रतिनिधी मुंबई, 22 फेब्रुवारी : आता राणीच्या बागेतसुद्धा वाघ आणि सिंहाची युती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचं झालं असं, सध्या राणीच्या बागेच नुतनीकरण करण्यात येत असून, यात गुजरातमधून पांढरा सिंह आणला जाणार आहे, तर औरंगाबाद प्राणी संग्रहलयातून एक वाघ आणला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा वाघ आणि गुजरातचा सिंह याची दोस्ती जिजामाता उद्यानात येत्या काळात तुम्हाला पाहायला मिळणार. यावर मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी 'सिंहाची काळजी वाघ घेईल' असं सूचक वक्त्यव्यही केलं. वीर जिजामाता भोसले उद्यानाबरोबरच प्राणी संग्रलायाचा विस्तार होणार  आहे. 3 टप्प्यात उद्यानाचं आणि प्राणी संग्राहालयाचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्याच्या कामकाजासाठी केंद्रीय प्राणी संग्रालायाकडून मंजूरी देण्यात आली आहे. यात पहिले दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या आव्हानात्मक टप्याच्या कामाला सुरुवात करण्यात येत आहे. तिसऱ्या टप्याची मंजुरी अवघ्या तीन महिन्यात मिळाली. या टप्प्यामध्ये प्राणी संग्रालायचा विस्तार करण्यात येत असून यामध्ये 12 एकरच्या भूखंडावर देशी विदेशी प्रजातीच्या प्राण्याकरिता विविध सुविधा विकसित करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्यातील  प्रस्तावित प्रकल्पामध्ये जागतिक दर्जाचे प्राणिसंग्रालाय करण्याचा प्रयत्न हा मुंबई महापालिकेचा असणार आहे. यामध्ये जग्वार, चित्ता, पांढरा सिंह, पाणघोडा, वेलेबी, झेब्रा, जिराफ, मॅड्रिल मंकी, चिपंजी, शहामृग, इमू, रिंगटेल लेमुर या प्राण्याकरिता पिंजरे तयार करण्यात येणार आहे. मे 2019 अखेर या कामाला सुरुवात होणार असून या कामासाठी 200 कोटीचा निधी खर्च केला जाणार आहे अशी माहिती मुंबईचे महपौर विश्वनाथ महाडेश्व यांनी दिली आहे. VIDEO : 'याची' तरी अक्कल आहे का?' धनंजय मुंडेंचा पंकजा यांच्यावर घणाघात
  First published: