Home /News /mumbai /

‘राजगृह’ हल्ला प्रकरण: आरोपी अजुनही मोकाटच, पोलिसांनी जाहीर केलं बक्षिस

‘राजगृह’ हल्ला प्रकरण: आरोपी अजुनही मोकाटच, पोलिसांनी जाहीर केलं बक्षिस

या आरोपीने ‘राजगृह’ या बंगल्याच्या परिसरातल्या कुंड्या आणि इतर सामानाची नासधूस केली होती.

मुंबई 15 जुलै: मुंबईतल्या ‘राजगृह’या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या घराच्या परिसरात एका माथेफिरूने तोडफोड केली होती. तो आरोपी अजुनही मोकाटच आहे. त्याची माहिती देण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता बक्षिसही जाहीर केलं आहे. आरोपीची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षिस देण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. 8 जुलैला या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घटनेनंतर पोलिसांनी CCTV फुटेज वरून आरोपीचा फोटोही प्रसिद्ध केला होता. या प्रकरणी माटुंगा पोलीस कसून तपास करत आहेत. मात्र आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. या आरोपीने ‘राजगृह’ या बंगल्याच्या परिसरातल्या कुंड्या आणि इतर सामानाची नासधूस केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला होता. आरोपीला तातडीने बेड्या ठोकण्याची मागणी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी केली होती. पोलिसांनी आता राजगृहाला चोविस तास संरक्षण पुरवलेलं आहे. लाखो आंबेडकर प्रेमींसाठी हे निवासस्थान हे प्रेरणा देणारं असल्याने या घराशी सगळ्यांच्या भावना निगडीत आहेत. त्यामुळे तातडीने आरोपीला पकडण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात पोलिसांना काही धागेदोरेही मिळाले असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या