Home /News /mumbai /

Mumbai Rains : मुंबईतील कोविड वॉर्डमध्ये शिरलं पाणी; रुग्णांचे हाल, पाहा VIDEO

Mumbai Rains : मुंबईतील कोविड वॉर्डमध्ये शिरलं पाणी; रुग्णांचे हाल, पाहा VIDEO

MUMBAI RAINS ALERT : पुढील 24 तास धोक्याचे, नागरिकांनो घराबाहेर पडू नका

    मुंबई, 23 सप्टेंबर : हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार काल रात्रीपासून राज्यातील अनेक भागात जोरदार सरी बरसत आहे. काल रात्रीपासून मुंबईतही पावसाचं बॅटिंग सुरू आहे. मुंबईतही या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहे. आधीच देशावर कोरोनाचं संकट असताना आता पावसाच्या कहरामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गुडघाभऱ पाणी साचले असून नागरिकांना रुग्णालयात येणं व बाहेर जाणं अवघड झालं आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोविड वॉर्डमध्ये पाणी साचलं आहे. हा व्हिडीओ मुंबईतील नायर रुग्णालयातील असून येथे रुग्णांचे हाल होत आहे. यातून संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर पालिकेने तातडीने काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. येत्या 24 तासांत मुंबईत मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. अंधेरी सबवे येथे 6 इंच पाणी जमा झालं आहे. इथली वाहतूक सुरु करण्यात आली आहे. डी एन नगर पोलीस ठाण्याचे पोलीस तिथे उपस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी जमा. रेल्वे व रोड वाहतूक वर परिणाम झाला आहे. येत्या 24 तासात जोरदार पावसांची शक्यता मात्र त्या मानाने जोर कमी असेल. पण गेल्या 24 तासातील मुसळधार पावसाचा प्रभाव आज ही दिसेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus, Mumbai rain

    पुढील बातम्या