घाटकोपरला तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत

घाटकोपरला तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत

  • Share this:

13 मे : मुंबईत वळव्याच्या पावसाचं निमित्त होऊन शुक्रवारी संध्याकाळी विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. घाटकोपर स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

घाटकोपर स्टेशनातील 1 आणि 2 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या स्लो ट्राकवरील वाहतूक फास्ट ट्राकवर वळवण्यात आल्यानं त्याचा फटका 'फास्ट लोकल'नाही बसला.

दरम्यान, रेल्वे प्रशासनानं थोड्याच वेळात बिघाड दुरुस्त केला आहे, पण वाहतूक पूर्वपदावर यायला आणखी वेळ लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2017 11:18 AM IST

ताज्या बातम्या