मुंबई, 09 जून : पहिल्याच पावसाने मुंबईला (Mumbai rains) झोडपून काढले आहे. मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) थेट मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये (BMC control room) पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर योग्य त्या सूचना प्रशासनाला दिलात.
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. दुपारी 3.10 च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई पालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचले. परिस्थितीचा आढावा घेतला.
PF खात्यात लवकरच येतील व्याजाचे पैसे,घरबसल्या जाणून घ्या तुमच्या खात्यातील रक्कम
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला.
''मुंबईची तुंबई झाली, जबाबदार कोण मुख्यमंत्री की पालिका?'', भाजपचा सवाल
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली व मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही, यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मुंबईत पाणी तुंबणारच नाही, असा दावा केलेला नाही - किशोरी पेडणेकर
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही सकाळी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची पाहणी केली. '4 तासांच्या आत पाण्याचा निचरा झाला नाही तर नालेसफाई काम चांगलं झालं नाही हे मान्य करावं लागेल. आज एकाच वेळी हायटाईड, सतत मुसळधार पाऊस यामुळे पाणी तुंबले आहे. मुंबईतील पावसाच्या परिस्थितीवर आम्ही आढावा घेतली आहे. १९५ मिली, १३७ मिली पाऊस झाला आहे. ९५ मिली पाऊस झाल्यास अंडरवॉटर पाणी डायव्हर्ट होतो. पण आता बऱ्याच ठिकाणी पाण्याचा निचरा झाला आहे. कुठे निष्काळजीपणा होत असेल तर कारवाई करू, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
विरोधकांना आरोप करायचे आहेत, ते करूदे, आम्ही उत्तर देत बसणार नाही. निंदकाचे घर असावे शेजारी, ते सांगतील ते ही बघून काम करू मुळात ट्विटरवर एक स्टँडर्ड आहे. आधी हे चांगल्या लोकांचं मानलं जायचं , आता कचऱ्यासारखा त्याचा वापर होतो., अश्या टीका करणाऱ्यांकडे फारसं कोणी लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यावर पलटवार केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.